West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 08:17 PM2021-05-02T20:17:14+5:302021-05-02T20:18:09+5:30
West Bengal result 2021: ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. याच बरोबर, संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जनतेला दिले. (Mamata Banerjee)
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील टीएमसीच्या शानदार प्रदर्शनानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जेनतेला संबोधित करण्यासाठी समोर आल्या तेव्हा म्हणाल्या, त्यांना डबल सेन्च्यूरीची अपेक्षा होती. 221 जागांवर विजय होण्याची आशा होती. हा विजय बंगालच्या जनतेचा विजय आहे. आम्ही जल्लोश करणार नाही. एक छोटासा समारंभ करून पुन्हा कोरोनाच्या सामना करण्यासाठी मैदानात उतरू. (Mamata Banerjee says if whole country not get free vaccine than will protest)
बंगालच्या जनतेला मिळणार मोफत कोरोना लस -
ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. याच बरोबर, संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जनतेला दिले.
देशातील लोकांना मोफत कोरोना लस दिली नाही तर आंदोलन -
ममता बॅनर्जी म्हणाल्या, देशातील जनतेला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आपण गांधी पुतळ्यासमोर पुन्हा आंदोलन करू. यावेळी, मिळालेल्या विजयाबद्दल त्यांनी टीएमसीकडून जनतेचे आभारही मानले. तसेच, कोरोनाच्या या कठीन काळातून बाहेर पडल्यानंतर आपण रॅली काढू, असेही ममता म्हणाल्या. तसेच आमचा शपथग्रहण समारंभ थोडक्यात होईल, यात कोरोनाचे नियमही पाळले जातील, असेही ममतांनी यावेळा सांगितले.
सत्तेत येताच ममता सरकार सर्वप्रथम काय करणार? -
तृणमूलचे वरिष्ठ नेते तथा मावळे शहर विकास मंत्री फरहाद हकीम यांनी रविवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य स्थिती पुन्हा एकदा रुळावर आणण्यास नव्या सरकारचे प्राधान्य असेल, असे म्हटले आहे.
ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा -
2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.
विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -
विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.