नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत थेट मोदी-शाहंना टक्कर दिल्यानंतर आता ममता बॅनर्जी TMC ला देशव्यापी करण्याच्या कामात लागल्या आहेत. यासंदर्भात पक्षातून TMC नाव बदलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तर, नावासंदर्भात कामही सुरू झाले आहे. TMC च्या पुढे अथवा मागे, असे काही जोडण्यावर विचार सुरू आहे, ज्यातून संपूर्ण भारताचे दर्शन होईल. याशिवाय, TMC उत्तर प्रदेशातील बसपाचे वरिष्ठ नेते आणि रणनीतीकार सतीश चंद्र मिश्रा यांच्याही संपर्कात आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 पार जाण्याचे वक्तव्य केले होते. मात्र, ममतांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळवले. आता TMC सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवणार आहेत. यासाठी आतापासूनच तयारीही सुरू झाली आहे.
काय आहे तयारी? - TMC ने उत्तर प्रदेशात संपर्क साधायलाही सुरुवात केली आहे. जवळपास मृतावस्थेत गेलेल्या बहुजन समाज पार्टी (BSP)चे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावतींचे सर्वात जास्त जवळचे सतीश चंद्र मिश्रादेखील त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, या राज्यात TMC आपल्या सहकाऱ्याचा शोध घेणार, की एकट्यानेच निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, TMC च्या एका मोठ्या नेत्याने म्हटल्याप्रमाणे, सर्वप्रथम या राज्यांत स्थान निर्माण करण्याला आमचे प्राधान्य असेल. मात्र, असेल असले तरी, सहकाऱ्यासोबत निवडणूल लढून आम्ही सत्ताधारी पक्षाला आव्हान देऊ शकतो, असे आम्हाला जाणवले तर आम्हाला दुसऱ्या पक्षाशी आघाडी करायलाही काहीच अडचण नाही.'
ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला
किमान उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांत भाजपला आव्हान देण्यासाठी भाजपच्याच नीतीचा अवलंब करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच, भाजपतील असंतुष्ट नेत्यांशी संपर्क साधून त्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तृणमूल काँग्रेस बंगालमधून बाहेर पडत देशाच्या इतर राज्यांत जाण्याच्या आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीला लागली आहे.