शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 5:43 PM

Sanjay Jaiswal : शाहबानो प्रकरणी ज्याप्रमाणे काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता. त्याचप्रमाणे एका विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी काँग्रेस राम मंदिराचा निर्णय बदलणार असल्याचे संजय जयस्वाल म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेस शतकानुशतके हिंदू धर्म, ब्राह्मण आणि हिंदू देवतांचा अपमान करत आहे. आपल्या व्होट बँकेच्या राजकारणाला बळ देण्यासाठी काँग्रेसला आता राम मंदिराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे, असे भाजपाचे नेते आणि एनडीएचे उमेदवार डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले. ते चनपाटिया आणि नौतानमध्ये जनसंपर्क दौऱ्यावेळी बोलत होते.

शाहबानो प्रकरणी ज्याप्रमाणे काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता. त्याचप्रमाणे एका विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी काँग्रेस राम मंदिराचा निर्णय बदलणार असल्याचे संजय जयस्वाल म्हणाले. तसेच, काँग्रेसला सनातन आणि प्रभू श्रीरामाची इतकी अडचण आहे की, त्यांनी प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता, असे संजय जयस्वाल यांनी सांगितले.

याचबरोबर, प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर राममंदिराला भेट देणाऱ्या किंवा समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा इतका अपमान झाला की, त्यांना पक्ष सोडावा लागला. सनातनवर बोलणारा काँग्रेसमध्ये राहणार नाही, हे यावरून सिद्ध होते, असे संजय जयस्वाल म्हणाले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपेंद्र सराफ, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धनरंजन कुमार आदी उपस्थित होते.

राम मंदिराबाबतचा निर्णय बदलण्याचा आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही केला होता दावाआचार्य प्रमोद कृष्णम यांनी राम मंदिराचा निर्णय बदलण्यासंदर्भात भाष्य काल केले होते. आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले होते की, "मी 32 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होतो. जेव्हा राम मंदिराचा निर्णय आला, तेव्हा राहुल गांधींनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत, ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर एक महासत्ता आयोगाची स्थपना करणार आणि राम मंदिराचा निर्णय अगदी तसाच बदलणार, ज्या पद्धतीने राजीव गांधी यांनी शाह बानोचा निर्णय बदलला होता."

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४