ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - 500 आणि 1000च्या नोटा दैनंदिन व्यवहारातून हद्दपार झाल्यानंतर अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. वेटिंग तिकीट काढल्यानंतर रद्द करून रेल्वेकडून रिफंड मिळवण्याची अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर 13 नोव्हेंबरनंतरच्या प्रवासांसाठी फर्स्ट एसी किंवा सेकंड एसीच्या वेटिंग लिस्टच्या तिकिटांचं काऊंटरवर बुकिंगच बंद केलं आहे. ऑनलाइन बुकिंग करतानाच फर्स्ट एसी आणि सेकंड एसीच्या तिकिटांचं वेटिंग लिस्टमध्ये तिकीट मिळेल. 10 आणि 11 नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. एका वेळेला 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची तिकिटं बूक करायची असल्यास पॅनकार्ड दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. 11 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हा नियम लागू राहील. बूक केलेलं तिकीट रद्द करून रेल्वेकडून पुन्हा रिफंड घेण्याची नामी शक्कल अनेकांनी अवलंबली. मात्र या सर्व तिकीट बूक करणाऱ्यांवर सरकारची देखील करडी नजर राहणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट आणि सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी
By admin | Published: November 10, 2016 7:55 PM