नवी दिल्ली: कृषी मंत्रालयाने खास शेतकऱ्यांसाठी एक अॅप तयार केले आहे. ओला आणि उबरच्या कार्यपद्धतीच्या धर्तीवर या अॅपद्वारे शेतकरी ट्रॅक्टरसह अन्य शेतीशी निगडीत उपकरणांची मागणी करु शकतील. यासाठी शेतकऱ्यांना काही भाडे द्यावे लागणार आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांना कस्टम हायरिंग सेंटर्सच्या माध्यमातून शेतीला लागणारे साहित्य पुरविले जाणार आहे. यासाठी देशभरात ३५ हजार कस्टम हायरिंग सेंटर्स तयार करण्यात आले असून वर्षाला अडिच लाख कृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे भाड्याने देण्याची क्षमता आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ आता अधिकच गडद होताना दिसत आहे. याचाच सर्वाधिक जास्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीसाठी अजब कारण सांगितले आहे. ओला, उबरसारख्या टॅक्सी सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद कारच्या विक्रीवर प्रभाव पाडत आहे. लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-६ मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
हे अॅप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येणार आहे. हे अॅप इंग्रजी, हिंदी, उर्दू, नेपाळी, कन्नड, मराठी, बंगालीसह १२ विविध भाषांतून उपलब्ध आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपली भाषा निवडावी लागणार आहे. त्यानंतर उऌउ/सर्व्हिस प्रोव्हायडर आणि शेतकरी/वापरकर्ता अशा दोन कॅटेगरी दिसतील. यातील शेतकरी/वापरकर्ता कॅटगरी निवडून नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी शेतकºयांचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह इतर माहिती द्यावी लागेल. यानंतरच्या पायरीवर डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डमध्ये ‘कृषी यंत्र की बुकिंग’सह सात वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. ‘कृषी यंत्र की बुकिंग’ची कॅटेगरी निवड केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर आपल्याला आवश्यक ते कृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे यंची निवड करावी लागेल. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रेलर, हॅप्पी सीडसह २५हून अधिक उपकरणे मिळतील.