नवी दिल्ली : देशातील १५१ विद्यमान खासदार आणि आमदारांवर महिलांविरोधातील गुन्हे दाखल असून, यात पश्चिम बंगालमधील सर्वाधिक खासदार आणि आमदार असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
एडीआरने २०१९ ते २०२४ दरम्यान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या विद्यमान खासदार आणि आमदारांच्या ४,८०९ प्रतिज्ञापत्रांपैकी ४,६९३ तपासली. त्यानंतर संबंधित १६ खासदार आणि १३५ आमदारांची माहिती समोर आली. हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या कथित बलात्कार आणि ठाण्याच्या मुलींवरील अत्याचाराबाबत देशभरात निदर्शने होत आहेत.
१० वर्षांची शिक्षा ? १६ विद्यमान खासदार आणि आमदार असे आहेत ज्यांच्यावर आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराशी संबंधित प्रकरणे नोंदवली आहेत, यात किमान १० वर्षांची शिक्षा आहे.
पुन्हा तिकीट देणार का? राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना, विशेषत: बलात्कार आणि महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेल्यांना तिकीट देण्यापासून परावृत्त करावे. पोलिसांकडून कसून तपास व्हावा, अशी मागणी एडीआरने केली आहे.
पक्षनिहाय अत्याचाराचे गुन्हे असणारे नेते भाजप ५४ काँग्रेस २३ टीडीपी १७ आप १३ तृणमूल काँग्रेस १० अपक्ष ६राष्ट्रवादी काँग्रेस १रासप १प्रहार जनशक्ती पार्टी १