नवी दिल्ली : प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात काय कारवाई केली, याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डास (सीपीसीबी) दिले आहेत.‘एनजीटी’चे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या नेतृत्वाखालील पीठाने म्हटले की, याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण बोर्डाने सादर केलेल्या अहवालात पर्यावरण संरक्षण कायदा १९६८ आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमान्वये काय दंडात्मक पावले उचलली याचा काहीही उल्लेख नाही. या कंपन्यांवर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कारवाई होऊ शकते; अथवा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो. एनजीटीने म्हटले की, याप्रकरणी १0 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यात यावा. कचऱ्याची जबाबदारी अॅमेझॉनची नसून, त्यावर वस्तू विकणाºयाची आहे, असा दावा करण्यात आला आहे, त्यावरही बोर्डाने विचार करावा.ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वेस्टनांचा वापर करू नये, यासाठी मनाई आदेश मागणारी एक याचिका एका १६ वर्षीय युवकाने अॅड. मिनेष दुबे यांच्यामार्फत दाखल केलेली आहे.
अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर काय कारवाई केली?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 3:06 AM