गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार सुरू झाला आहे. कुकी उग्रवाद्यांनी सहा जणांची हत्या केली होती. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले असून या गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना लवकरच न्यायाच्या कठड्यात आणले जाईल, असे सांगितले.
हिंसाचारावर बोलताना बिरेन सिंह म्हणाले की, गेल्या आठवड्यात जिरीबाम जिल्ह्यातील एका नदीतून ज्यांचे मृतदेह सापडले होते, त्या तीन महिला आणि मुलांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला आणि मुलांची हत्या हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे सांगितले.
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले की, कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममध्ये तीन निष्पाप मुलांची आणि ओलिस ठेवलेल्या तीन महिलांच्या भीषण हत्येचा निषेध करतो. असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले,"कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशा रानटी कृत्यांना जागा नाही. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही." त्यांच्या अमानुष कृत्यांसाठी जबाबदार धरले जाते."
मणिपूरमध्ये जवळपास १८ महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, जातीय संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने गेल्या आठवड्यात सहा भागात AFSPA पुन्हा लागू केला, जिथून तो एका वर्षापूर्वी उठवला गेला होता, त्यामुळे इम्फाळ खोऱ्यात निषेधाची एक नवीन लाट निर्माण झाली.