नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील कसौली येथील नारायणी गेस्ट हाऊसच्या मालकाने सरकारच्या नियोजन अधिकाºयांची गोळ्या झाडून हत्या केल्याची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून गंभीर दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेस्ट हाऊ सचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या नगरनियोजन खात्याच्या महिला अधिकारी शैैलबाला शर्मा यांची मालकाने मंगळवारी हत्या केली होती.शैैलबाला शर्मा यांच्यावर गेस्ट हाऊ सच्या मालकाने गोळीबार केला तेव्हा तेथे सरकारी अधिकाºयांसमवेत असलेले पोलीस पथक नेमके काय करत होते, असा सवालही न्यायालयाने विचारला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी असलेल्या शैलबाला शर्मा यांची झालेली हत्या हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.लोकांनी अशा हत्या करणे सुरू केले, तर आम्हाला कदाचित कोणतेही आदेश देणेच थांबवावे लागेल, अशीही तंबी न्यायालयाने दिली. हे प्रकरण कोणत्या खंडपीठाला सुनावणीसाठी द्यावे याचा निर्णय घेण्यासाठी ते गुरुवारी सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यासमोर सादर करण्यात येईल.हिमाचल प्रदेशच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, नारायणी गेस्ट हाऊसचा मालक श्रीमती शर्मा यांच्यावर गोळीबार केला व तो पळून गेला. जखमी शैैलबाला या नंतर मरण पावल्या.सोलन जिल्ह्यातील नारायणी गेस्ट हाउससह १३ हॉटेलांनी केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी)ने दिला होता. या हॉटेलांना दंडही ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयानेही ती अनधिकृत बांधकामे पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम खात्याने कारवाई सुरू केली होती.
महिला अधिकाऱ्याची हत्या होताना पोलीस पथक काय करत होते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:58 AM