काय सांगता? ज्येष्ठ नागरिकांना विमानाने तीर्थयात्रा, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 05:50 PM2023-02-06T17:50:17+5:302023-02-07T12:48:46+5:30
मध्य प्रदेश सरकारच्या या योजनेला मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र यात्रा दर्शन या नावाने सुरू करण्यात येणार आहे.
दिल्ली सरकारने रेल्वेतून तिर्थयात्रा घडवल्यानंतर आता मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मार्च महिन्यापासून तीर्थयात्रेसाठी पाठवण्यात येणार आहे. भिंड येथे संत रविदास जयंती आणि चंभल संभागच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. संत रविदास यांच्या जन्मठिकाणाचा या सरकारी तिर्थक्षेत्र यात्रआ योजनेत समावेश केला जाईल.
मध्य प्रदेश सरकारच्या या योजनेला मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा दर्शन या नावाने सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनाही विमानाने प्रवास करता येणार आहे. या योजनेंतर्गत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक सरकारी खर्चातून यादीतील कुठल्याही तिर्थक्षेत्राची यात्रा करु शकतात. भिंड शहराला महानगरपालिकेच्या अनुषंगाने अपग्रेड केले जाईल, असेही यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले.
भिंड शहराला एक मेडिकल कॉलेजही देण्यात येणार आहे. सध्या येथे नगरपालिका कार्यरत आहे. विकास यात्रा सर्वच वार्डात जाऊन पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, विविध योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला या यात्रेची सांगता होणार आहे.
ऐसा चाहूँ राज मैं, जहाँ मिलै सबन को अन्न।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 5, 2023
छोट बड़ो सब सम बसै, रैदास रहै प्रसन्न।।
संत रविदास जी की जयंती पर उनके चरणों में प्रणाम करता हूँ। हम पूरी श्रद्धा और उत्साह से संत रविदास जी की जयंती प्रदेशभर में मना रहे हैं। 8 फरवरी को सागर में संत रविदास कुंभ भी होगा। pic.twitter.com/uM8ElOgSAq
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तिर्थयात्रा घडवून आणत आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात एकदाच या यात्रेचा लाभ घेता येणार आहे.