नवी दिल्ली - भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे. पाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच सध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या प्रश्नाबाबत गडकरी म्हणाले की, पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा निर्ण हा केवळ माझ्या खात्याचा नसेल. सरकार, पंतप्रधान यांच्या स्तरावर हा निर्णय होईल. पण मी माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्यांना पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी कुठे कुठे रोखता येईल, याबाबत तांत्रिक आराखडा बनवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.''
दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:27 AM
भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे.
ठळक मुद्देपाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहेसध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही