शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 6:21 AM

संसद अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार, खर्गे यांचं वक्तव्य. मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, खर्गे यांनी साधला निशाणा.

ठळक मुद्देसंसद अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार, खर्गे यांचं वक्तव्य.मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, खर्गे यांनी साधला निशाणा.

दोन महिन्यांत ३८ वेळा दरवाढ केली. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या असून मोदी सरकारने इंधनाच्या करातून २५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचे काय केले, असा सवाल काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला.

इंधनाच्या करातून गोळा केलेला हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारांसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारू, असे खर्गे म्हणाले. गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेत खर्गे यांनी इंधन दरवाढ, महागाई, अर्थव्यवस्था, कृषी कायदे या मुद्द्यांवर मोदी सरकारची पोलखोल केली. ते म्हणाले, संपुआचे सरकार असताना इंधनावर ९.४८ टक्के केंद्रीय कर होता तो वाढवून ३२.९० रुपये केला आहे. संपुआ सरकार असताना क्रूड ऑईलची किंमत १११ डॉलर प्रति बॅरल असताना पेट्रोल ७१ रुपये लिटर होते आणि आता मोदी सरकारच्या काळात क्रूड ऑईलचे दर ४४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरले असतानाही पेट्रोल १०७ रुपये प्रति लिटर एवढ्या चढ्या भावाने विकले जात आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आता ८३४ रुपये झाली आहे, सामान्य माणसांना दिले जाणारे गॅसवरील अनुदानही अनेक महिन्यांपासून शून्य केले आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली तर या माध्यमातून दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे मोदींनी म्हटले होते. याचा अर्थ या योजनेतून आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांची  बचत झाली. डाळीच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत १२.७२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सूर्यफुल तेल ५६.३१ टक्क्यांनी तर सोयातेल ५२.६६ टक्क्यांनी महाग झाले आहे. या भाववाढीचा फटका लोकांना बसत आहे, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्यावर आणले होते, मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. संपुआ सरकारने १० वर्षांत कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालवले. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ९७ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे.

कोरोनामुळे वर्षभरात १.३३ लाख नोकऱ्या गेल्याकोरोनामुळे एका वर्षात १.३३ लाख नोकऱ्या गेल्या. दरडोई उत्पन्न १० हजार रुपयांनी घटले, जीडीपी ९-१० टक्क्यांनी घसरला. देश रसातळाला गेला पण त्याची जबाबदारी मोदी सरकार घेत नसून इंधन दरवाढीला संपुआ सरकारच जबाबदार असल्याचा उलटा आरोप करत आहे. परंतु कररूपाने लाखो कोटी रुपये कमावूनही राज्याच्या हक्कांचा जीएसटी परतावाही मोदी सरकार देत नाही. महाराष्ट्राचा ३२ हजार कोटी रुपयांचा जीएसटी परतावा अजून दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विश्वगुरु होण्यास निघालेल्या मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, असेही खर्गे म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानPetrolपेट्रोलDieselडिझेलParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीTaxकर