न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सीईओ भारतीय वंशाचे सत्या नडेला (५२) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) चिंता व्यक्त केली आहे. नडेला यांनी म्हटले आहे की, एखाद्या बांगलादेशी निर्वासिताने भारतात अशा बहुराष्ट्रीय कंपनीचे नेतृत्व करावे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला लाभ होऊ शकेल.
मूळ हैदराबादचे असलेल्या सत्या नडेला यांनी म्हटले आहे की, प्रत्येक देशाने राष्ट्रीय सुरक्षेची काळजी करावी. त्यानुसार आपले धोरण ठरवावे. मायक्रोसॉफ्टच्या एका कार्यक्रमात संपादकांशी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक देशाने आपल्या सीमा परिभाषित कराव्यात. राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करावे. नडेला यांना सीएएबाबत मत विचारण्यात आले.
‘बजफीड’ न्यूजने नडेला यांचे उत्तर टष्ट्वीटरवर पोस्ट केले आहे. नडेला म्हणाले की, भारतात जे होत आहे ते दु:खद आहे. मी बहुसंस्कृती असणाºया भारत आणि अमेरिकेत वाढलो आहे. मी अशी अपेक्षा करतो की, भारतात एखाद्या निर्वासिताने मोठ्या कंपनीचे नेतृत्व करावे.विरोधकांची एकता आवश्यक : अमर्त्य सेन
सीएए रद्द करण्याची मागणी केल्यानंतर काही दिवसांनी नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे की, निदर्शने करण्यासाठी विरोधकांची एकता आवश्यक आहे. तथापि, विरोधकांची एकता नसतानाही निदर्शने सुरू राहू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, कोणत्याही आंदोलनासाठी विरोधकांची एकता आवश्यक आहे. जर एकता होत नसेल तरीही आम्हाला पुढे जावे लागेल.