Union Budget 2022 Nirmala Sitharaman schedule: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस हा व्यस्त वेळापत्रकाचा असणार. खरं पाहता केंद्रीय अर्थसंकल्प हा जरी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सादर होत असला तरी त्या आधीदेखील बऱ्याच गोष्टी घडतात. ११ वाजता सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपासूनच घडामोडींना वेग येतो. अर्थमंत्री सुमारे ८.४० ला नॉर्थ ब्लॉकच्या दिशेने निघतात. तेथे पत्रकारांसाठी फोटो काढले जातात. त्यानंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या मंजूरीसाठी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतात. त्यानंतरही पत्रकारांसाठी फोटो काढले जातात. आणि मग ११ च्या सुमारास अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरू होते.
पाहा, कसा असेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आजचं वेळापत्रक
सकाळी ८.४० वा. - अर्थमंत्री नॉर्थ ब्लॉकसाठी रवानासकाळी ९ वा. - नॉर्थ ब्लॉकच्या गेट क्रमांक २ बाहेर फोटोसकाळी ९.२५ वा. - अर्थसंकल्पावर मंजूरीसाठी अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाकडे रवानासकाळी १० वा. - अर्थमंत्री संसदेकडे परतणार व तेथे बजेट फोटोसेशनसकाळी १०.१० वा. - अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकसकाळी ११ वा. - संसदेत अर्थसंकल्प सादरीकरणदुपारी ३.४५ वा. - अर्थसंकल्प सादरीकरणानंतरची पत्रकार परिषद
दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने कर सवलत, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणे, PF आणि PPF निधीमधील गुंतवणूक कर कक्षेबाहेर ठेवणे, तसेच आरोग्य सेवेवर नव्याने लक्ष केंद्रित करणे या स्वरूपात काही प्रमाणात दिलासा द्यावा, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचा फटका यामुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहेच. त्यात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत साऱ्यांनाच या अर्थसंकल्पाकडून सकारात्मक अपेक्षा आहेत.