शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

राज्य विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्या तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 8:31 AM

‘एक देश, एक निवडणूक’ : राज्यांमध्ये सहमतीसाठी येणार ब्लू प्रिंट

संजय शर्मा

नवी दिल्ली : एक देश, एक निवडणुकीसाठी १२ पेक्षा जास्त घटना दुरुस्त्यांची यादी तयार केली जात आहे. राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित करण्याच्या मुद्द्यावर राज्यांची सहमती मिळवण्याचा प्रयत्न समिती करेल, असे समजते.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील एक देश, एक निवडणूक समितीच्या बैठकीत शनिवारी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यासंबंधीचे विधेयक लागू करण्यासाठी एक डझनापेक्षा अधिक घटना दुरुस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था मुदतपूर्व विसर्जित करण्यात आल्या, तर अशा स्थितीत कोणत्या प्रकारची तरतूद करावी लागेल, या मुद्द्यावर समितीच्या सदस्यांना राज्यांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद आदी उपस्थित होते.

सर्वांत जास्त अडचण कोणत्या विषयाची?सर्वांत जास्त अडचणीचा मुद्दा राज्यांच्या विधानसभांबाबत समोर येत आहे. राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ निश्चित कसा करावा? एखादे सरकार कधीही पडते किंवा विधानसभा विसर्जित झाली, तर उर्वरित कालावधीसाठी राज्यपाल हेच सरकार चालवतील की कसे, अशा सर्व मुद्द्यांवर राज्यांशीही चर्चा करून सहमतीचा मार्ग काढण्यात येणार आहे.

काय चिंता व्यक्त केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी?n ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये ८०व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत जाहीर भाष्य केले होते. n मोदी यांनी तेव्हा म्हटले होते की, ‘एक देश, एक निवडणूक’ हा निव्वळ चर्चेचा विषय नसून भारताची गरज आहे. प्रत्येक महिन्यात देशात कुठे ना कुठे निवडणूक सुरू असते. त्यामुळे विकासकार्यावर परिणाम होतो.’

१९५२ ते १९६७ होत होत्या एकत्रच निवडणुकाn १९५२ पासून १९६७ पर्यंत देशात एकत्रच निवडणुका होत होत्या. त्यात लोकसभा व विधानसभांसाठी जनता आपले प्रतिनिधी एकाच वेळी निवडत होती. n त्यानंतर सरकारे मध्येच कोसळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या निवडणुका होऊ लागल्या.n विशेष म्हणजे देशात प्रत्येक सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीमुळे देशाला दर पाच वर्षांनी १० लाख कोटी रुपयांचा फटका बसतो. यामुळे विकासकामे प्रभावित होतात. n सत्तेत आल्यावर प्रत्येक राजकीय पक्ष खुर्ची वाचवण्यासाठी कोणताही समझोता करण्यास तयार होतात. या सर्वांत जनता भरडली जाते. वरून महागाईचा बडगा पडतो आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकOne Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन