नवी दिल्ली -काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद ((Ghulam Nabi Azad)) यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. यावेळी जम्मू काश्मिरातील एका दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, ''ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आमची चांगली जवळीक होती. एकदा गुजरातचे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केले. या हल्ल्यात आठ लोक मारले गेले होते. सर्वप्रथम गुलाम नबी यांचा मला फोन आला.'' एवढे बोलताच पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. (What internet users say about Modi being emotional in Rajya sabha)
यावेळी मोदींनी सांगितले, की आझाद यांनी गुजरातच्या नागरिकांची अशी चिंता केली, जशी एखादा आपल्या कुटुंबाची करतो. एएनआयने या प्रसंगाचा व्हिडिओदेखील ट्विट केला आहे. यात पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे दिसत आहे. ते बोलताना मधेच पाणीही घेताना दिसत आहेत. शेवटी त्यांनी आझादांना सॅल्यूटदेखील केले.
राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही
काय म्हणत आहेत लोक? - आता ट्विटरचं जग आहे. येथे कुणीच वाचू शकत नाही. काही लोकांनी मोदींच्या या भाषणाची तारीफ केली, काहींनी आपले मत मांडले, तर काही जण बोलले, की ते त्यांना (मोदींना) रडताना पाहू शकत नाही.
हे तर आनंदाश्रू -
Video:...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले; काँग्रेस खासदाराच्या निरोप समारंभावेळी गहिवरून आले
सत्ता येईल, जाईल… -
काही यूझर्सनी तर पंतप्रधानांच्या भावूक होण्याला अॅक्टिंग देखील म्हटले आहे. त्यांना अॅक्टिंगसाठी पुरस्कार मिळायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे.
कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद
राजकारणात कुणीही शत्रू नसतो -
टाळ्या… -