शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 21:29 IST

Cabinet Committee on Security, Pahalgam Terror Attack: 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी'मध्ये घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय

Cabinet Committee on Security, Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक सुमारे अडीच तासानंतर संपली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, प्रति-कारवाई आणि भविष्यातील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तब्बल अडीच तास चालली बैठक

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (CCS) बैठक बोलावली होती. दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक अडीच तासांहून अधिक काळ चालली. या बैठकीत भारतातील सुरक्षा परिस्थितीवर, विशेषतः पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात सखोल चर्चा झाली.

सुरक्षा मंत्रिमंडळ समिती म्हणजे काय?

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) - Cabinet Committee on Security ही देशातील सर्वोच्च सुरक्षा समिती आहे. संविधानात याचा उल्लेख नाही. राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि सीमा सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर CCS समिती धोरणात्मक निर्णय घेते. पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष आहेत; तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह