कर्नाटक काँग्रेसमध्ये चाललंय काय? या मंत्र्याच्या एका वक्तव्यानं पक्षाचं टेन्शन वाढलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:11 PM2023-06-14T16:11:36+5:302023-06-14T16:12:14+5:30
एवढेच नाही, तर कर्नाटक सरकारमध्ये सर्वकाही व्यवस्थित नाही, असा दावाही परमेश्वर यांनी केला आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी 'दलित सीएम' मुद्याव केलेल्या एका वक्तव्याने काँग्रेचे टेन्शन वाढवले आहे. त्यांच्या 'दलित सीएम' न बनवल्यासंदर्भातील या वक्यतव्याने कर्नाटकातीलराजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर कर्नाटक सरकारमध्ये सर्वकाही व्यवस्थित नाही, असा दावाही परमेश्वर यांनी केला आहे.
येथील अंबेडकर भवनमध्ये विविध समाजांकडून आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्य सभेत जी परमेश्वर म्हणाले, मी कर्नाटक काँग्रेसचा प्रेदेशाध्यक्ष असताना 2013 मध्ये काँग्रेसला सत्तेवर आणूनही मी मुख्यमंत्री होऊ शकलो नाही. खरे तर, माझ्याच नेतृत्वाखाली पक्षाने विजय मिळवला होता. मात्र असे असतानाही मला कुणीही क्रेडिट दिले नाही आणि मीही ते घेण्याचा प्रयत्न केला नाही. यानंतर 2018 मध्ये दलितांची उपेक्षा केल्यानेच पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दलितांची उपेक्षा करणाऱ्या तथाकथित बड्या नेत्यांना निवडणुकीत सर्वकाही शिकवायचे होते.
धक्कादाक गोष्ट म्हणजे, सिद्धरमया सरकारमधील मंत्री परमेश्वर यांनी, जाणून-बुजून दलित नेत्याला सीएम बनवले जात नाही. मी अथवा सामाज कल्याण मंत्री डॉ. एचसी महादेवाप्पा, अन्न आणि पुरवठामंत्री केएच मुनियप्पा यांना मुख्यमंत्री का बनवता येऊ शकत नाही, असा सवाल केला आहे. एवढेच नाही, तर दलित नेत्यांनी हीनभावना सोडून एत्र येण्याचे आवाहनही परमेश्वर यांनी यावेळी केले.
जी परमेश्वर हे कर्नाटकातील एक मोठे दलित नेते आहेत. त्यांनी कधीही काँग्रेस प्रति असेली आपली निष्ठा सोडलेली नाही. त्यामुळे त्यांचे वक्तव्य महत्वाचे आणि धक्कादायक माणले जात आहे.