बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:40 PM2024-08-07T14:40:56+5:302024-08-07T14:41:39+5:30

Bangladesh Protests: भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असे विधान सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनी म्हटलं आहे.  

What is happening in Bangladesh can happen in India too, claims Salman Khurshid of Congress  | बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा 

बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा 

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाची परिणती सत्तांतरामध्ये झाली होती. आंदोलकांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशातून पलायन केलं होतं. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडींवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. जे बांगलादेशमध्ये घडत आहे, ते भारतातही घडू शकतं, असा दावा सलमान खुर्शिद यांनी केला आहे. भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असेही सलमान खुर्शिद यांनी म्हटलं आहे.  

एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना काँग्रेस नेत सलमान खुर्शिद म्हणाले की, काश्मीरमध्ये सारं काही सामान्य दिसत आहे. येथेही सर्वकाही आलबेल आहे, असं वाटू शकतं. आपण विजयाचा आनंद साजरा करत आहोत. मात्र २०२४ मधील विजय किंवा यश हे अगदीच किरकोळ असेल, अजून बरंच काही करणं बाकी आहे. खरं सांगायचं झाल्यास येथे खाली खूप काही आहे. बांगलादेशमध्ये जे घडत आहे, ते भारतामध्येही घडू शकते. आपल्या देशामध्ये जो प्रसार होत आहे, तो बांगलादेशप्रमाणे घडणाऱ्या गोष्टींना पसरण्यापासून रोखत आहे.

सलमान खुर्शिद यांनी पुढे सांगितलं की, दक्षिण पूर्व दिल्लीमधील शाहीनबाह येथे महिलांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सीएए-एनआरसीविरोधातील आंदोलन जवळपास १०० दिवस चाललं, त्या आंदोलनाने देशाला अशा प्रकारचं आंदोलन करण्याची प्रेरणा दिली.  मात्र हे एक अयशस्वी आंदोलन ठरले, कारण यामध्ये सहभागी होणारे अनेकजण अद्याप तुरुंगात आहेत. आज देशामध्ये शाहीनबागसारखं दुसरं आंदोलन होऊ शकत नाही. 

मी शाहीनबाग आंदोलन अयशस्वी झालं, असं म्हटल्यास तुम्हाला वाईट वाटेल? आपल्यापैकी अनेकजण शाहीन बाग आंदोलन यशस्वी झालं, असं मानतात. मात्र शाहिनबागशी संबंधित लोकांसोबत काय घडतंय हे मला माहिती आहे. त्यामधील किती लोक अद्याप तुरुंगात आहेत?  त्यामधील कितीजणांना जामीन मिळत नाही? यामधील किती लोकांनी देशाचं शत्रू ठरवण्यात आलं आहे, हे मला माहिती आहे. 

Web Title: What is happening in Bangladesh can happen in India too, claims Salman Khurshid of Congress 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.