Operation Octopus: बंदी घालण्यात आलेली संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED)च्या छाप्यांमध्ये मोठमोठे खुलासे केले जात आहेत. सुरक्षा यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, PFI वर देशभरात छापेमारी करण्यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी PFI च्या सर्व बड्या नेत्यांच्या ठिकाणांबाबत ठोस माहिती गोळा केली होती. ज्या PFI नेत्यांवर छापे टाकले जाणार होते, त्यांची ठिकाणी (GPS Location) पिन-पॉइंट करून NIA आणि ED ला प्रदान करण्यात आली, जेणेकरून छापे मारण्यासाठी जाणारी टीम योग्य ठिकाणी कारवाई करू शकेल. पण त्यांनी ही GPS Locations कशी मिळाली, याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगतो...
कशी मिळाली GPS Location?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून PFI च्या प्रत्येक प्रमुख कॅडरवर तपास यंत्रणांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात होते. छाप्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी ही माहिती राज्य पोलिसांशी शेअर करण्यात आली होती. PFI वर कारवाई करण्याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे कारवाईच्या वेळी काही वेळ आधी ही माहिती शेअर करण्यात आली. एका केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, PFI विरुद्ध छापा टाकण्यापूर्वी, रात्री १२ वाजता PFI विरुद्ध कारवाईची माहिती राज्य पोलिसांशी शेअर केली गेली. जेणेकरून छाप्याची माहिती कुठेही लीक होऊ नये. छापा टाकणाऱ्या पथकाने चुकूनही चुकीच्या ठिकाणी छापा टाकू नये म्हणून PFI नेत्यांची जीपीएस लोकेशन्स NIA आणि ED च्या टीमला देण्यात आली होती. एवढेच नाही तर PFI चे कोणतेही मोठे कॅडर पळून जाऊ नये, म्हणून छापा टाकून PFI च्या सर्व नेत्यांच्या त्या वेळच्या ठिकाणांची माहिती पुन्हा एकदा मिळवण्यात आली आणि पुढील कारवाई करण्यात आली.
असं करण्यात आलं प्लॅनिंग!
देशातील अनेक राज्यांमध्ये, गेल्या काही महिन्यांपासून हिंसा आणि दहशतीशी संबंधित प्रकरणांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)शी संबंधित संशयितांची नावे आल्याने सुरक्षा यंत्रणा चिंतेत होत्या. उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ यांसारख्या राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात PFI शी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचे होते. गृहमंत्री अमित शाह यांनी PFI वर कारवाई करण्याचे ठरवले होते. सर्वप्रथम, २९ ऑगस्ट रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा एजन्सीशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, IB चे प्रमुख तपन डेका आणि रॉ चीफ सामंत गोयल उपस्थित होते. बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व एजन्सींना पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित क्रियाकलापांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले. सर्व यंत्रणांना वेगवेगळी माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले. PFI विरुद्धच्या ऑपरेशनला Operation Octopus नावाचा कोड होता. त्यानुसार देशभरात छापेमारी करण्यात आली.