नवी दिल्ली: देशातील जवळपास ९७ टक्के स्वच्छता कर्मचारी, ९५ टक्के कचरा वेचक आणि ८२ टक्के सुरक्षा रक्षक यांना कामाच्या वेळी वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागते, ६० टक्के स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटच माहीत नाही, असा दावा शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. चिंतन पर्यावरण संशोधन आणि कृती गटाद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासात कचरा वेचणारे, स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक या तीन व्यावसायिक गटांसाठी वायू प्रदूषण आणि श्वसनाच्या आजाराच्या घटनांमधील संबंधांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
४५% सहभागींचे (नियंत्रण गटातील) फुफ्फुसाचे कार्य असामान्य होते.
'चिंतन' च्या शिफारशी
■ स्वयंसेवी संस्थेने वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे व पीपीई किटच्या कार्यक्षम वापरावरील प्रशिक्षणासाठी तरतुदीची शिफारस केली आहे.■ कामाच्या ठिकाणी हात, चेहरा धुण्याची सुविधा अनिवार्य करावी. हिवाळ्यात गरम पाणी पुरवावे.
■ कचरा जाळणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार स्वच्छता निरीक्षकांना द्यावे आणि मोठ्या रस्त्यांवर यांत्रिक सफाई करावी.