अहमदाबाद - पंतप्रधान होण्याआधी भ्रष्टाचारावर बोलणारे नरेंद्र मोदींनी जय शहाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर भ्रष्टाचार या शब्दाचा उल्लेख करणेच बंद केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदींनी फक्त काही उद्योगपतींचा विकास केला आहे. मागील 22 वर्षांत गुजरातच्या जनतेला काय दिले याचा त्यांनी हिशेब द्यावा अशी मागणी केली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
प्रचारसभांच्यावेळी राहुल गांधींनी अनेकवेळा मंदिरात जाणे पसंत केले. त्यांच्या या भूमिकेवर भाजपने व पंतप्रधान मोदींनी अनेकावेळा टीका केली. यावर बोलताना राहुल गांधी यांनी मला मंदिरात जाण्यास मनाई आहे का, असा सवालच उपस्थित केला. मी आत्ताच नव्हे तर नेहमीच मंदिरात दर्शनासाठी जातो. मला मंदिरात जायला आवडतं, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
काय म्हणाले राहुल -
- आमचे गुजरात विकासाचे व्हिजन तयार, गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग - राहुल गांधी
- पंतप्रधान होण्याआधी मोदी भ्रष्ट्रचारावर बोलायचे, आता गप्प का? राहुल गांधी
- मोदींचेे आर्थिक धोरण अतार्किक - राहुल गांधी
- मंदिरात जाणं निषिद्ध आहे का? राहुल गांधी यांचा विरोधकांना सवाल
- मोदींचेे आर्थिक धोरण अतार्किक - राहुल गांधी
- नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान - राहुल गांधी
- गुजरातमधील विकास संतुलित नाही - राहुल गांधी
- मी हवेत बोलत नाही, आम्ही करुन दाखवलंय - राहुल गांधी
- मोदी स्वत:बद्दल बोलतात किंवा काँग्रेसबद्ल - राहुल गांधी
- गुजरातमधील शेतकऱ्यांकडे मोदींच दुर्लक्ष - राहुल गांधी
- नरेंद्र मोदी एकतर स्वत:बद्दल बोलतात किंवा काँग्रेसबद्दल
- गेल्या 20 वर्षांत गुजरातमध्ये फक्त मोजक्याच लोकांचा विकास झाला - राहुल गांधी
- गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार, राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास
- भाजपने विकासाचा केवळ आभास निर्माण केला : राहुल गांधी