पीएनबी घोटाळ्यावर मोदी गप्प का? कर्नाटकमध्ये जोरदार सभा; राहुल गांधी यांनी विचारला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:14 AM2018-02-26T00:14:17+5:302018-02-26T00:14:17+5:30
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ््याबद्दल स्वत:चा देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख करून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत, अशा शब्दांत रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरील हल्ले सुरूच ठेवले.
मुलावड (कर्नाटक) : पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ््याबद्दल स्वत:चा देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख करून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत, अशा शब्दांत रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरील हल्ले सुरूच ठेवले.
कर्नाटकमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय यांच्या मालकीच्या कंपनीच्या अचानक वाढलेल्या उलाढालीबद्दल कोणतीच कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न मोदी यांना विचारला.
‘मोदी जी कर्नाटकात येतात व भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. त्यांनी (मोदी) देशवासियांना सांगितले होते की मला पंतप्रधान नव्हे तर देशाचा चौकीदार बनवा, असे राहुल गांधी म्हणाले. मोदी यांच्या एका हाताला तुरुंगात जाऊन आलेले त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री (बी. एस. येद्दुयुरप्पा) आणि दुसºया हाताला भाजपच्या सरकारमधील चार माजी मंत्री (हेदेखील तुरुंगात जाऊन आलेले) यांच्यामध्ये मोदी बसून भ्रष्टाचाराच्याविरोधात बोलतात, असा हल्ला राहुल गांधी यांनी केला. अमित शाह यांच्या मुलाने अवघ्या तीन महिन्यांत ५० हजार रूपयांचे ८० कोटी रूपये बनवले आणि देशाचे चौकीदार त्याची ना चौकशी करतात ना त्याबद्दल एखादा शब्द उच्चारतात, असा आरोप गांधी यांनी केला.
अमित शाह यांनी त्यांचा मुलगा जय यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप फेटाळले. भाजप २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर जय शाह यांचा व्यवसाय प्रचंड गतीने वाढला अशी बातमी दिलेल्या न्यूज पोर्टलवर जय शाह यांनी बदनामीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. राहुल गांधी हे कर्नाटकच्या उत्तरेकडील भागांच्या तीन दिवसांच्या दौºयावर असून रविवार हा त्याचा दुसरा दिवस होता. त्यांची ही पंधरवड्यापेक्षाही कमी कालावधीत राज्याची दुसरी भेट आहे.
वृक्षथॉनला हिरवा झेंडा
विजयपुरा : पर्यावरण, पाणी आणि वृक्षांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी निघणाºया वृक्षथॉनला गांधी यांनी रविवारी येथे हिरवाझेंडा दाखवला. पिवळ््या रंगाचा टी शर्ट त्यांच्या अंगात होता. समाजातील वेगवेगळ््या थरांतील शेकडो लोक यावेळी उपस्थित होते.