काय आहे एमपीडीए ?
By admin | Published: October 21, 2016 12:18 AM
हेड कॉन्स्टेबल रोहणकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३५३, १८६, ३३२, ३३३, ३२३, २९४, ५०६ (ब) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. जखमीपैकी खळतकर हे गंभीर असून त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार आहे. त्यांचा सीटी स्कॅन काढण्यात आलेला आहे.
हेड कॉन्स्टेबल रोहणकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३५३, १८६, ३३२, ३३३, ३२३, २९४, ५०६ (ब) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. जखमीपैकी खळतकर हे गंभीर असून त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार आहे. त्यांचा सीटी स्कॅन काढण्यात आलेला आहे.पोलिसांनी रातोरात हल्लेखोरांचा शोध घेऊन गुणवंत तुमसरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा चार दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. उपराजधानीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवरील हल्ल्याच्या प्रमाणात दिवंसेदिवस वाढ होत असल्याने हल्लेखोरांविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कायद्यानुसार पोलिसांना हल्लेखोरांना जामिनाशिवाय किमान तीन महिने आणि जास्तीत जास्त एक वर्ष पोलीस कोठडीत ठेवण्याची मुभा आहे.