नवी दिल्ली - आपण आजपर्यंत लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा विचार केल्यास आपल्या ह्रदयाचे ठोके, पल्स किंवा शरिरातील इतर काही बाबींच्या तपासणीसाठी स्मार्टवॉचचा उपयोग करत होतो. मात्र, शास्त्रज्ञांनी आता असे कापड तयार केले आहे, ज्याद्वारे आपल्या ह्रदयाची आणि श्वासांची काळजी घेण्यात येईल. मॅसाचुएट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआईटी) आणि रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाइन (आरआईएसडी) च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या फॅब्रिकमुळे (कापड) ह्रदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास यांचा आवाज सहज ऐकता येईल.
या कापडाद्वारे आपल्या आजूबाजुचा कोणता कमी तीव्रतेचा आवाजही ऐकता येणार आहे. हा कपडा मायक्रोफोन आणि स्पीकर दोघांचेही काम एकटाच बजावतो. एका नॅशनल जनरलमध्ये हा शोध प्रबंध प्रकाशित करण्यात आला आहे. एमआयटीचे प्रमुख शास्त्रज्ञ के वेई यान यांनी म्हटले की, हे कापड मानवी त्वचेसोबत इंटरफेस केला जाऊ शकतो. त्यामुळे, हे कापड परिधान करणारा आपले ह्रदय आणि श्वसनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊ शकतो. या कपड्याला आणखी जास्त अपग्रेड करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्यामुळे स्पेसफ्लाईट आणि बिल्डिंग क्रॅकलाही मॉनिटर करू शकेल.
कसा येतो आवाज?शास्त्रज्ञांच्या मतानुसार, ज्याप्रमाणे एक मायक्रोफोन काम करतो, त्याचप्रमाणे हे कापड आवाजाच्या यंत्रणेत परावर्तित होतो. त्यानंतर, या कंपनाला विद्यूत संकेतांमध्ये बदलले जाते. ज्याप्रमाणे आपले कान काम करतात. एमआयटीचे शास्त्रज्ञ गोयल फिंक म्हणतात की, मानवी कानाच्या पडद्यापासून प्रेरित होऊन आम्ही हा कपडा बनवला आहे. त्यामुळे, माणसाच्या कानाचे पडदेही एक प्रकारच्या फॅब्रिकपासूनच बनवले जातात.