शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

गुजरात देशात नाही काय?

By admin | Published: February 02, 2016 2:57 AM

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आणि गुजरातसारखे राज्य संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आणि गुजरातसारखे राज्य संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी का करीत नाहीत, असा सवाल केला.संसद काय करीत आहे, गुजरात भारताचा हिस्सा नाही काय, हा कायदा संपूर्ण भारतासाठी असताना गुजरातमध्ये तो अद्याप लागू का करण्यात आला नाही? उद्या कुणी असेही म्हणेल की आम्ही फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि पुरावा कायदा अमलात आणणार नाही, अशा अत्यंत कडक शब्दात न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या नेतृत्वातील पीठाने ताशेरे ओढले. सोबतच केंद्र सरकारला दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मनरेगा,अन्न सुरक्षा आणि मध्यान्ह भोजनसारख्या कल्याणकारी योजनांच्या स्थितीबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देशही दिले.केंद्र सरकारला येत्या १० फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायचे असून त्यानंतर दोन दिवसांनी पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १८ जानेवारीला केंद्र सरकारला मनरेगा, अन्नसुरक्षा, मध्यान्ह भोजन योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात माहिती देण्यास सांगितले होते. दुष्काळग्रस्त भागातील लोकांना किमान आवश्यक रोजगार आणि भोजन उपलब्ध होत आहे की नाही, हे न्यायालयाला जाणून घ्यायचे होते. स्वराज अभियानच्या मागण्यादुष्काळग्रस्तांना डाळ, खाद्यतेलही देण्यात यावे. शाळकरी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दूध आणि अंडीही मिळावीत. पीक नुकसानीची वेळीच आणि योग्य नुकसानभरपाई दिली जावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता सबसिडी आणि जनावरांसाठी सवलतीच्या दरात चारा मिळावा. (लोकमत न्यूज नेटवर्क)> सर्वोच्च न्यायालय एका जनहित याचिकेवर सुनावणी करीत आहे. उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड, बिहार, हरियाणा आणि चंदीगड या राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ असताना तेथील अधिकारी मात्र योग्य मदत पुरवीत नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. > ‘स्वराज अभियान’ नावाच्या स्वयंसेवी संघटनेने ही याचिका केली असून योगेंद्र यादव त्याचे नेते आहेत. अन्नसुरक्षा योजना लागू करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला पाच किलो धान्याची हमी देण्यात आली आहे.