- नंदकिशोर पुरोहितअहमदाबाद : येथील नागरिकांसाठी एकत्र होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ऐकणे काही नवी बाब नाही. पण, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. स्वत: भाजप अध्यक्ष अमित शहा लोकांसोबत ‘मन की बात’ऐकण्यासाठी दाखल झाले होते. दरियापूर विधानसभा क्षेत्रातील एका बूथवरील हे चित्र होते.लोकांमध्ये याची उत्सुकता होती की, गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी मन की बात जाहीर करतील का? यासाठी अहमदाबादेतील दरियापूर ही जागा यासाठी निवडली गेली कारण हा अल्पसंख्यांक बहुल भाग आहे. येथे अमित शहा यांनी स्वत: जबाबदारी घेतली आहे. सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी तयारीला लागले होते. अल्पसंख्यांक भाग असूनही येथे अल्पसंख्यांक जवळपास नसल्यासारखेच होते. काँग्रेसने चहाच्या मुद्यावरुन तिरपी नजर केल्यानंतर भाजपने ‘मन की बात चाय के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन करत हा मुद्दा बनविला आणि राज्यातील सर्वच मतदारसंघात आपल्या दिग्गजांना उतरविले.पंतप्रधान मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या दोन महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. वेगवेगळ्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख दलित समुदायाला संबोधित करत होता. तर, सरदार पटेल यांचा उल्लेख पाटीदार समुदायासाठी होता. दोन्ही समुदाय यावेळी भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहेत.दरियापूरमध्ये या कार्यक्रमासाठी आलेल्या किरण ठाकूर यांनी सांगितले की, मोदी यांनी हे सिद्ध केले आहे की, भाजप जाती संपद्रायाला नव्हे तर, कामाला महत्व देतो. त्यामुळे डॉ. आंबेडकर आणि सरदार पटेल यांनी जे काम केले त्याचाच उल्लेख मन की बातमध्ये केला. त्याला निवडणुकीशी जोडले जाऊ नये. मात्र, एक अन्य कार्यकर्ता भूषण जोशी यांचे म्हणणे होते की, काँग्रेसच्या नेत्यांनी या दोन्ही महान नेत्यांचा कधी सन्मान केला नाही. जर मोदी या दोन्ही नेत्यांच्या कार्यांचा उल्लेख करुन या समुदायाला भाजपसोबत आणत असतील तर काय चूक आहे?पंतप्रधानांचे संबोधन संपल्यानंतर अमित शहा प्रचारासाठी रवाना झाले. तिकडे कार्यक्रमस्थळी काही अंतरावर एका चहाविक्रेत्याला अहमद हुसैन यांना विचारले की, आपण पंतप्रधानांची मन की बात ऐकली काय? तेव्हा त्यांचे उत्तर होते की, आमची मन की बात कोणी ऐकते काय?
आमची ‘मन की बात’ कोणी ऐकते काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 2:11 AM