नवी दिल्ली- राज्यसभेच्या तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षावर पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, नेते टीका करत आहेत. आपने संजय सिंह यांंच्याबरोबर एन. डी. गुप्ता आणि सुशील गुप्ता यांची उमेदवारीसाठी निवड केली आहे.कुमार विश्वास यांनी उपरोधिक शैलीत केजरीवाल आणि त्यांच्या टीमवर टीका केली तर ट्विटरवर आपचे माजी नेते आणि मार्गदर्शक प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. तसेच मयांक गांधी यांनीही आप आणि बसपामध्ये काहीच फरक राहिलेला नाही, अशा हताश भावना व्यक्त करणारे ट्विट केले आहे.आपल्या ट्विटमध्ये योगेंद्र यादव म्हणतात, "अरविंदचे कितीही दोष असतील पण त्याला कोणीही विकत घेऊ शकत नाही, असं गेल्या तीन वर्षांपासून मी अनेकांना सांगितलंय, म्हणूनच मी कपिल शर्मा यांनी केलेले आरोप फेटाळले, पण आज काय बोलायचं तेच कळत नाही, मी हैराण झालोय, मलाच लाज वाटू लागली आहे."
क्या कहूँ, हैरान हूँ, शर्मसार हूँ - योगेंद्र यादवांचे हताश उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 8:46 PM