प्रख्यात उद्योगपती नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी देशातील तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करावे, असा सल्ला दिला होता. त्यावरून देशात चर्चेला तोंड फुटले होते. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आठवड्यात केवळ तीन दिवसच काम केलं पाहिजे, असं मत मांडलं आहे. दोन्ही दिग्गज उद्योगपतींचं मत परस्परविरोधी आहे. त्यातही बिल गेट्स यांचा सल्ला कर्मचाऱ्यांना अधिक योग्य वाटू शकतो. दरम्यान, या मुद्द्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आता मत प्रदर्शित केलं आहे.
शशी थरूर यांनी सांगितले की, नारायण मूर्ती आणि बिल गेट्स या दोघांनीही एकत्र बसलं पाहिले. त्यांनी कुठल्या तरी एका वस्तूवर कॉम्प्रमाईज केलं पाहिजे. थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केलं की, बिल गेट्स म्हणतात दिन दिवसांचा आठवडा असला पाहिजे. अशा परिस्थितील बिल गेट्स आणि नारायण मूर्ती यांनी एकत्र बसावं, जर असं झालं तर आम्ही फॉलो करत असलेल्या ५ दिवसांच्या आठवड्याच्या वर्किंग कल्चरवर सहमती बनेल, असे थरूर म्हणाले.
मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी हल्लीच एखा मुलाखतीमध्ये या मुद्द्यावर आपलं मत मांडलं होतं. ते म्हणाले होते की, आता जमाना आर्टिफिशियल इंटेलिजेन्सकडे वेगाने जात आहे. एआयच्या मदतीने काम आणखी सोपे करून तीन दिवसांचा आठवडा निश्चित केला पाहिजे. जीवन हे कामापेक्षा मोठं आहे. तसेच ते मोठंच असलं पाहिजे.