शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

आमदार, खासदारांवरील खटल्यांची सद्य:स्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:34 AM

देशभरात आमदार व खासदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांची नेमकी स्थिती काय आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांकडून मागविली आहे.

नवी दिल्ली : देशभरात आमदार व खासदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांची नेमकी स्थिती काय आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांकडून मागविली आहे. राज्यांचे मुख्य सचिव आणि तेथील उच्च न्यायालयांच्या महाप्रबंधकांनी ही माहिती देणारी प्रतिज्ञापत्रे १२ आॅक्टोबरपर्यंत करायची आहेत. त्यात आमदार, खासदारांवर किती फौजदारी खटले प्रलंबित आहेत, त्यांची सद्य:स्थिती काय? तसेच हे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली का, याचा तपशील द्यायचा आहे.विशेष न्यायालये स्थापन केली असतील, तर ती प्रलंबित खटले शक्यतो वर्षभरात निकाली काढण्यासाठी पुरेशी आहेत का? याचीही माहिती राज्यांनी द्यायची आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आहे. आमदार, खासदारांची प्रतिमा स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने त्यांच्याविरुद्धचे खटले लवकर निकाली निघणे श्रेयस्कर आहे, असे नमूद करून न्यायालयाने यासाठी प्रत्येक राज्यात विशेष न्यायालये स्थापन करण्याचा आदेश गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिला होता. त्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारला सर्व राज्यांकडून माहिती घेऊन ती एकत्रित स्वरूपात सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार केंद्रीय विधि आणि न्याय मंत्रालयाने ११ सप्टेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. हे प्रतिज्ञापत्र बुधवारी न्या. रंजन गोगोई, न्या. नवीन सिन्हा व न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे आले तेव्हा न्यायालयाचे त्याने समाधान झाले नाही.अजूनही १,०९७ खटले प्रलंबितन्यायालयाने आदेश देऊनही ११ राज्यांनी माहिती दिली. १८ राज्यांनी दिली नाही, असे केंद्राने सांगितले. ११ राज्यांच्या माहितीनुसार तेथे प्रत्येकी एक विशेष न्यायालय, तर दिल्लीत दोन विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली. या राज्यांत आमदार, खासदारांवरील १,२३३ खटल्यांपैकी १३६ निकाली निघाले आहेत व बाकीचे १,०९७ प्रलंबित आहेत.नुसती न्यायालये स्थापन करून उपयोग नाही. ती प्रत्यक्ष सुरू आहेत की नाहीत हेही पाहावे, असा याचिकाकर्त्यांच्या वकिलाने आग्रह धरला. अनेक राज्यांत ‘पॉस्को’ कायद्यान्वये विशेष न्यायालये स्थापन झाली; परंतु न्यायाधीश न नेमल्याने ती सुरू नाहीत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सर्व राज्यांना माहिती सादर करण्याचे पुन्हा एकदा निर्देश दिले व गरज पडल्यास यावर आपण वेळोवेळी लक्षही ठेवू, असे सूचित केले.

टॅग्स :Courtन्यायालय