अमरिंदर सिंग आता काय पाऊल उचलणार? २ ऑक्टोबरला घोषणा शक्य  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:55 PM2021-09-24T13:55:03+5:302021-09-24T13:55:10+5:30

दिल्लीतील त्यांचे ओएसडी नरेंद्र भांबरी यांनी ट्वीटरवर एक पोस्टर शेअर केले आहे. याचे शीर्षक आहे कॅप्टन २०२२. एक मोठा धमाका करत परत येत असल्याचे ट्वीटही भांबरी यांनी केले आहे.

What steps will Amarinder Singh take now Announcement possible on October 2 | अमरिंदर सिंग आता काय पाऊल उचलणार? २ ऑक्टोबरला घोषणा शक्य  

अमरिंदर सिंग आता काय पाऊल उचलणार? २ ऑक्टोबरला घोषणा शक्य  

Next

नवी दिल्ली : काँग्रेसनेपंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता पक्षाचे लक्ष माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या हालचालींकडे आहे. अमरिंदर सिंग यांनी प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. 

दिल्लीतील त्यांचे ओएसडी नरेंद्र भांबरी यांनी ट्वीटरवर एक पोस्टर शेअर केले आहे. याचे शीर्षक आहे कॅप्टन २०२२. एक मोठा धमाका करत परत येत असल्याचे ट्वीटही भांबरी यांनी केले आहे. त्यानंतर काही तासांनी अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांच्याविरुद्ध उमेदवार उभा करणार आहोत. 

भाजपमध्ये नाहीच...
-     पक्षाचे अगोदरपासून लक्ष होते की, अमरिंदर सिंग हे भाजपच्या दिशेने जात आहेत का? २ ऑक्टोबर रोजी ते राजकीय भवितव्याबाबत मोठी घोषणा करू शकतात, असे सांगितले जात आहे. 
-     राज्यातील अनेक शेतकरी संघटनांचे त्यांना समर्थन आहे. अर्थात, भाजप हा पंजाबमधील अनेक नेत्यांचा काही पर्याय होऊ शकत नाही. विशेषत: कृषी कायद्याकडे बघण्याचा केंद्राचा दृष्टिकोन पाहता कोणताही नेता त्या पक्षाकडे जाण्याचे पाऊल उचलणार नाही.
 

Web Title: What steps will Amarinder Singh take now Announcement possible on October 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.