शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 7:30 PM

IC 814 Kandahar hijack: नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.

नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. दरम्यान, मानवेंद्र सिंह यांनी ते अपहरणकांड आणि जसवंत सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मानवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आयसी ८१४ या अपहरण झालेल्या प्रवासी विमानाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारताच्या एका विमानानं हवेत उड्डाण केलं होतं. त्यामध्ये एनएसजी कमांडो तैनात होते. जर दुबईने परवानगी दिली असती तर भारताने तिथेच कारवाई केली असती. मात्र दुबईकडून तशी परवानगी मिळाली नाही. मात्र भारताने अपहरणकर्त्यांवर आणलेला दबाव काही प्रमाणात उपयोगाला आला. तसेच विमानात इंधन भरण्याच्या मोबदल्यात महिला आणि मुलांना विमानातून उतरवण्यात आलं. तसेच एका मृत पॅसेंजरचा मृतदेहही विमानातून बाहेर काढण्यात आला.  

दरम्यान, विमान अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने गेलेल्या जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या एका लाल सुटकेसबाबतही मानवेंद्र सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारकडून काही पर्याय शोधण्यात येत होते. काही तोडगा निघेल का? याची चाचपणी करण्यात येत होती. पैशांच्या देवाणघेवामीचा विषय नव्हता. तसेच लाल सुटकेस नेण्यासारखंही काही घडलं नव्हतं. एका राज्यसभा खासदारांने अशा प्रकारच्या चर्चा सुरू केल्या होत्या. तेव्हापासूनच लाल सुटकेसवरून टीका केली जात आहे.  मी स्वत: माझ्या वडिलांना सोडण्यासाठी विमानतळावर गेलो होते. ते एक ब्रिफकेस नेहमी स्वत:जवळ बाळगायचे. त्यामध्ये पूजेचं साहित्य आणि माळा असायची. मात्र ती ब्रिफकेससुद्धा त्यांनी त्या दिवशी नेली नव्हती. आता बोलणारे काहीही बोलतील, असं ते म्हणाले. 

मानवेंद्र सिंह यांनी पुढे सांगितलं की, विमानाच्या अपहरणानंतर जेव्हा दहशतवादी विमान कंधारला घेऊन गेले तेव्हा दहशतद्यांच्या सुटकेसोबत वाटाघाटी करण्यासाठी एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांनेही यावं, म्हणून बोलावणं आलं होतं. त्यावेळी अशी जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नव्हतं. अखेरीस परराष्ट्रमंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. हाच धर्म होता, असे ते म्हणाले.  

टॅग्स :airplaneविमानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतterroristदहशतवादीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा