नवी दिल्ली - कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. यामुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास व्यक्त करत मोदींनी या पॅकेजचा उल्लेख 'आत्मनिर्भर भारत' असा केला. संकट हीच संधी मानून देशाला स्वावलंबी करण्याचा निश्चय यावेळी मोदींनी व्यक्त केला. 21 वं शतक भारताचं असेल असं म्हटलं जात होतं. त्यामुळे कोरोना संकटाकडे आपण संधी म्हणून पाहायला हवं, असंही मोदी म्हणाले. याच दरम्यान पंतप्रधानांनी सुरुवातीलाच वायटूके 'Y2K' या संकटाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी या संकटाचा उल्लेख का केला आणि 'Y2K' म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया.
'Y2K' संकट म्हणजे नेमकं काय?
तंत्रज्ञानाच्या मदतीने आता देशात अमूलाग्र बदल झाले आहेत. विज्ञानाच्या जोरावर विविध गोष्टींची किमया साधण्यात यश आले आहे. मात्र सुरुवातील तंत्रज्ञान फारसे विकसित झालेले नव्हते. जगात 1999 हे वर्ष संपण्याचा काळ होता. त्यावेळी संगणक डिफॉल्टप्रमाणे पुढच्या वर्षाला 1900 करणार होते. मात्र जर असे झाले असते तर जगभरातील गणना चुकीची झाली असती. 2000 च्या सुरुवातीला संख्यावरून संगणकातील कॅलेंडर आणि स्टोरेजमध्ये कोणतीही समस्या आल्यास त्याला वायटूके संकट आलं असं म्हटलं गेलं. 'Y2K'मधील वायचा अर्थ ईयर (वर्ष), 2 चा अर्थ दोन आणि केचा अर्थ हजार म्हणजेच 2000 असा आहे.
1999 हे वर्ष संपलं होतं आणि 2000 या वर्षाची सुरुवात झाली. मात्र जगभरातील संगणक यंत्रणा ही 31 डिसेंबर 1999 च्या पुढे जाण्यास सक्षम नव्हते. सर्वांसाठी ही समस्या कायम होती. परंतु, भारतीय कम्प्यूटर इंजिनिअर्संनी असे संगणक तयार केले जे एकविसाव्या शतकातील आहेत. देश सध्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणात कठोर परिश्रम आणि मेहनतीचे उदाहरण देण्यासाठी 'Y2K'चा उल्लेख केलेला असावा असं म्हटलं जातं आहे.
काही वर्षांपूर्वी आलेल्या 'Y2K संकटामुळे टेक्नोलॉजी जगात भूकंप आला होता. संगणकामध्ये 21व्या शतकासाठी प्रोग्राम उपलब्ध नसल्याने ते नष्ट होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात होती. मोठे नुकसान झाले होते. याच दरम्यान भारतात इन्फोसिस, विप्रो यासारखी आयटी कंपन्या सुरू झाल्या होत्या. हा एक बग ठीक करण्यासाठी जगभरात 600 ते 1600 बिलियन यूएस डॉलर्स खर्च करावे लागले होते. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांनी पुढे येऊन या संकटावर मात केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...
CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट
CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल