"...तेव्हा भाजपचे 85 खासदार काय करत होते?", 'द काश्मीर फाइल्स'वरून काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 11:46 AM2022-03-16T11:46:36+5:302022-03-16T11:50:29+5:30
Randeep Surjewala : काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान आणि इतर भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर तयार करण्यात आलेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. असे चित्रपट अनेकवेळा व्हायला हवेत, असे ते म्हणाले. याशिवाय, भाजप संसदीय दलाच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी या चित्रपटाचा उल्लेख करत सांगितले की, चित्रपटात अनेक वर्षांपासून दडपलेले सत्य दाखवण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त भाजपचे अनेक नेते काश्मीरमधील हत्याकांडावरून काँग्रेसवर निशाणा साधत आहेत.
या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान आणि इतर भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी सरकार किती काळ द्वेष आणि खोटे बोलण्यासाठी राजकीय संधी शोधत राहणार आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी म्हटले आहे. "देशाच्या पंतप्रधानांना बापूंच्या आदर्शांपासून ते काश्मिरी पंडितांच्या वेदनांपर्यंत सर्व काही चित्रपटावर सोडायचं आहे? मोदी सरकारला त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव कधी होणार? वस्तुस्थिती आणि सत्याकडे पाठ फिरवायची काय? शेवटी, किती दिवस आपण फक्त खोटं-द्वेष-विभाजनामध्ये राजकीय संधी शोधत राहणार? असे अनेक सवाल रणदीप सुरजेवाल यांनी ट्विटद्वारे केले आहेत.
दुसर्या ट्विटमध्ये रणदीप सुरजेवाला म्हणाले, '1925 ते 1947 मध्ये स्थापनेपासून तुमची पालक संघटना देशाच्या स्वातंत्र्य चळवळी आणि बापूंच्या विरोधात उभी होती. मग ते 'असहकार आंदोलन' असो, 'सविनय कायदेभंग' असो किंवा 'छोडो भारत' देशव्यापी आंदोलन असो. प्रत्येक वेळी इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले. देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्या दिवसापासून 'फोडा आणि राज्य करा'चा अवलंब करण्यात आला. मोदीजी, 1990 मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांना दहशत आणि रानटीपणाच्या छायेखाली पळून जावे लागले, तेव्हा भाजपचे 85 खासदार काय होते, ज्यांच्या पाठिंब्यावर केंद्रातील व्हीपी सिंह सरकार करत होते? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची बदली करून सुरक्षा देण्याऐवजी पंडितांना पळून जाण्यास का भडकावली? असे सवाल रणदीप सुरजेवाला यांनी केले आहेत.
3/n
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 15, 2022
मोदी जी बताएँ-
जब 1990 में कश्मीरी पंडित आतंक और बर्बरता के साये में पलायन को मजबूर हुए
तब भाजपा के 85 सांसद, जिनके समर्थन से केंद्र की वी.पी.सिंह सरकार चल रही थी, क्या कर रहे थे?
CM को हटाकर उनके बिठाए राज्यपाल ने सुरक्षा देने की बजाय पंडितों को पलायन के लिए क्यों उकसाया?
याचबरोबर, 'लक्षात ठेवा, जेव्हा काश्मिरी पंडितांचा छळ केला जात होता आणि भाजप समर्थित सरकारच्या नेतृत्वात राजीव गांधींनी संसदेचा घेराव केला होता, आवाज उठवला होता. मात्र भाजपने राजकीय फायद्यासाठी ‘रथयात्रा’ काढून या शोकांतिकेला छुपा पाठिंबा दिला. ते तेव्हाही होते आणि आजही तसेच आहेत', असे रणदीप सुरजेवाला म्हणाले. तसेच, रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, 'मोदी सरकारने 8 वर्षात काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी काय केले? काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा बिघडली, हिंसाचार वाढला आणि हजारो काश्मिरींना पळून जावे लागले. काश्मिरी पंडितांसाठी काही करू शकत नसताना त्यांनी ‘फिल्म’ दाखवायला सुरुवात केली? द्वेषाच्या लागवडीतून नफ्याचे पीक किती दिवस हाती घ्यायचे? असेही रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
तसेच, काश्मिरी पंडितांना पळून जावे लागले तेव्हा दिल्ली सरकार तुमच्या पाठिंब्यावर चालत होते. तुमचे नेते श्री जगमोहन हे राज्यपाल असताना मुख्यमंत्र्यांना हटवून त्यांनी जबाबदारी सोडली. भाजप आणि अडवाणी जी 'रथयात्रेत' व्यस्त होते तेव्हा त्या रथयात्रेचे ऑपरेटर-इव्हेंट मॅनेजर मोदीजी होते, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.