नवी दिल्ली : प्रत्येक लोकसभा निवडणूक ही पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते. प्रचाराच्या बाबतीत, युती आणि आघाड्यांसह विविध पातळ्यांवर यंदाची निवडणूकही वेगळी ठरली आहे. चौकीदारपासून ते गरिबीचे सर्जिकल स्ट्राइकपर्यंत आणि पुलवामा हल्ल्यापासून ते मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरविण्यापर्यंत अनेक मुद्दे राजकीय मैदानात धुरळा उडवून गेले.
1977आणीबाणीनंतर इंदिराविरोधी लाटआणीबाणीनंतर लगेच १९७७ साली निवडणूक झाली. त्यात काँग्रेसविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते.1984इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीची लाट१९८४ साली या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला ४०३ जागा मिळाल्या होत्या.1989पुन्हा काँग्रेसचापराभव१९८९ मध्ये मतदानाचा टक्का वाढलेला राहिला आणि काँग्रेसचा पराभव झाला.1998जनतेने दिलीवाजपेयींना सत्ता१९९८ मध्ये मतदान वाढले आणि पुन्हा बदल झाला. जनतेने अटल बिहारी वाजपेयींच्या हाती सत्ता दिली. यापूर्वी त्यांचे सरकार एका मताने पडले होते.2014नरेंद्र मोदीयांची लाटया वर्षी रेकॉर्डब्रेक मतदान झाले. त्यात मोदींची लाट स्पष्ट दिसून आली. एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले. मोदी पंतप्रधान झाले.2014 मध्ये ज्या ताकदीने भाजपने सोशल मीडियाचा वापर केला, त्याच ताकदीने काँग्रेसनेही सोशल मीडियाचा उपयोग करून घेतल्याचे दिसून आले. मतदान जागृतीसाठी मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच देशात मतदानाचा टक्का ६०च्या वर पोहोचला, पण जेव्हा-जेव्हा हा टक्का ६० च्या वर गेला, तेव्हा काहीतरी नवीन घडल्याचे १९७७ च्या निवडणुकीपासून दिसून आले आहे. त्याचा हा आढावा.2019अब की बार?यावेळीही मतदानाचा टक्का ६०च्या वर गेला आहे. त्यामुळे यंदा काय करिश्मा पाहायला मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.