शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

पुतळे पाडून काय होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 4:37 PM

भाजपावाल्यांनी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर त्या राज्यातील दक्षिण भागात ब्लादिमिर लेनिनचे दोन पुतळे उद््ध्वस्त केले असा आरोप होत आहे. त्यातील एक पुतळा त्रिपुरातील बेलोनिया व दुसरा पुतळा सब्रुम भागात होता.

- समीर परांजपेभाजपावाल्यांनी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर त्या राज्यातील दक्षिण भागात ब्लादिमिर लेनिनचे दोन पुतळे उद््ध्वस्त केले असा आरोप होत आहे. त्यातील एक पुतळा त्रिपुरातील बेलोनिया व दुसरा पुतळा सब्रुम भागात होता. त्रिपुरा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच हे प्रकार घडले आहेत. या घटनांमुळे काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका व्याख्यानाची आठवण झाली. इंटरनेट काय, जागतिकीकरण ही संकल्पनाही अस्तित्वात यायची होती अशा काळात लोकमान्य टिळक यांना लेनिन आणि लिंकन आपापल्या देशात करत असलेल्या कार्याची व त्यांच्या विचारांची स्पष्ट कल्पना होती. त्याचवेळी, कामगारांमध्ये टिळकांविषयी असलेल्या प्रीतीबद्दल लेनिन यांनाही कुतूहल होते. आपली राष्ट्रीय चळवळ पुढे नेताना जागतिक बदलांची नोंद आपण सतत घेतली पाहिजे, याचे एक वैश्विक भान लोकमान्यांना होते. लोकमान्यांच्या या पैलूवर चर्चा करण्यासाठी पार्ले टिळक विद्यालयात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.लिंकन, लेनिन आणि लोकमान्य - आदर्शवादाचा जागतिक संघर्ष या विषयावर हे व्याख्यान होते. लेनिन व सावरकरांचाही संपर्क झाला होता. लोकमान्य टिळक व सावरकर हे हिंदुत्ववादी होते. त्यांना लेनिनचे वावडे नव्हते कारण त्याचे विचार त्यांना समजून घ्यायचे होते. भाजपवाल्यांचा लेनिनच्या पुतळ्यापेक्षा त्याचे विचार आदर्श आहेत, असे भासवत त्रिपुराचे तीन-तेरा वाजविणा-या साम्यवाद्यांवर रोष असावा. मात्र त्यासाठी लेनिनचा पुतळा पाडणे हा मूर्खपणा आहे. महापुरुषांच्या विचारांचा त्यांचे अनुयायीच पराभव करतात ते डाव्यांनी देशात करून दाखविले आहे. मात्र त्यांच्या गैरगोष्टींसाठी लेनिन किंवा अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांवर राग काढणे ही बमियानमधे तालिबान्यांनी गौतम बुद्धाच्या शिल्पांचा जो विध्वंस केला त्याचीच री ओढण्यासारखे आहे. युक्रेनमध्ये २०१३-२०१४ या कालावधीत खारकिव्ह शहरामध्ये लेनिनचा एक अतिभव्य पुतळा होता तो रशियाच्या विरोधकांनी पाडून टाकला.युक्रेनमध्ये जिथे जिथे लेनिनचे पुतळे होते ते फोडण्यात आले. रशियावरील राग प्रतीकात्मकरीत्या प्रकट झाला. पण युक्रेनची परिस्थिती त्यामुळे सुधारली नाहीच शिवाय साम्यवादी विरोधक जे सत्तेवर आले त्यांनी युक्रेनचे अजून मातेरे केले. वस्तुस्थिती आता अशी आहे की युक्रेनला रशियावर त्यामुळे अजून विसंबून राहण्याची पाळी आली. युक्रेनमधे गेल्या वर्षी तेथील गल्लीबोळात असलेले लेनिनचे १३७०पुतळे पाडून टाकले. रशियातही लेनिनचे पुतळे नकोसे होऊ लागलेत. त्याच्या अनेक वर्षे जपून ठेवलेल्या पार्थिवाची आता कायमची विल्हेवाट लावा, असे आता रशियातील तरुण पिढी बोलत आहे.लेनिनचा मृत्यू १९२१ साली झाला. बोल्शेविक क्रांतिचा प्रणेता, सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक व सोव्हिएत युनियनचा प्रिमियर म्हणून ब्लादिमिर लेनिनचे स्थान अढळ होते. मात्र २६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर लेनिनच्या जगभरातील पुतळ्यांना वाईट दिवस आले. जगभरात लेनिनचा हा पुतळा हे रशियातील कम्युनिस्ट विचारसरणीचे एक प्रबळ प्रतीक मानले जात असे. मात्र त्या पुतळ्यांचा दबदबा सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर कमी होऊ लागला. युक्रेनमध्ये लेनिननचा पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला. त्याशिवाय रशियातील काही भाग तसेच लिथुआनिया, लॅटव्हिया, मंगोलिया, घाना, क्युबा, व्हिएतनाम, जॉर्जिया, स्वालबार्ड, चेचेन्या, ताजिकिस्तान, इथिओपिया, बल्गेरिया, सिएटल येथे असलेले लेनिनचे पुतळेही असेच कालौघात उद्ध्वस्त करण्यात आले.ब्लादिमिर लेनिन याचे निधन २१ जानेवारी १९२४ रोजी झाले. तो ह्यात असतानाच त्याचे नाव रशियातील चौकांना, रस्त्यांना देण्याची पद्धत रूढ होऊ लागली होती. लेनिनच्या मृत्यूनंतर त्याची अंत्ययात्रा काढू नका, त्याचे पुतळे उभारू नका, अशी इच्छा त्याची पत्नी कुपस्काया हिने व्यक्त केली होती. लेनिनचीही तशीच इच्छा होती असे तिचे म्हणणे होते. मात्र स्टॅलिन हा धूर्त होता. त्याने लेनिन मेल्यानंतर त्याचे पार्थिव जतन करून ठेवले, लेनिनची भव्य अंत्ययात्रा काढली, त्याचे स्मारक बांधले. हे सारे करण्यामागे लेनिनच्या नंतर रशियाची सत्तासूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती येण्यात कोणताही अडथळा यायला नको म्हणून या सा-या गोष्टी स्टॅलिनने चालविल्या होत्या. व्होल्गा जेव्हा लाल होते या वि. स. वाळिंबे लिखित लेनिनच्या चरित्रग्रंथात या सा-या घटनांचे तपशील बारकाईने देण्यात आलेले आहेत. रशियात लेनिनच्या मृत्यूनंतर त्याचे पुतळे उभारायचे पेवच फुटले. त्यातील काही पुतळे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर तोडण्यात आले. रशियात लेनिनचे जे पुतळे उरलेले आहेत त्यांचीही भविष्यात किती पत्रास ठेवली जाईल हे सांगता येत नाही.युक्रेनप्रमाणे उद्या रशियातही लेनिनचे नाव पुसण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण या प्रतीकात्मक गोष्टींनी त्या देशाचे प्रश्न काही सुटणार नाहीत. चार्वाक निरीश्वरवादी होता. त्याने वेद वगैरे सगळे त्याज्य आहेत हे सांगितले पण मग स्वीकारायचे काय हा ठाम पर्याय तो देऊ शकला नाही. परिणामी चार्वाकच संपला. ज्या भाजपावाल्यांनी लेनिनचा पुतळा पाडला त्यांनी चार्वाकला नीट लक्षात ठेवावे. पुतळे पाडून त्या महापुरुषाच्या विचारांचे महत्त्व कमी होत नाही.