- एस.पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारमध्ये खेला होबे होणार का? उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मागील १०-१५ दिवसांपासून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. जेथे नितीशकुमार असतील, तेथे तेजस्वी जात नाहीत. यामुळे राज्यात महाआघाडीमध्ये नक्कीच काही तरी सुरू आहे, अशी चर्चा आहे. आपल्याला मुख्यमंत्रिपद न दिल्यामुळे तेजस्वी यादव नाराज असल्याचे समजते.
१२ डिसेंबर : चंपारण येथील पर्यटन विभागाच्या कार्यक्रमाला तेजस्वी यादव हजर राहिले नाहीत. १३ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, असे कार्यक्रम पत्रिकेत होते; परंतु तेजस्वी अनुपस्थित राहिले.
अनुपस्थितीत का राहिले?१३ आणि १४ डिसेंबर : पाटण्यात गुंतवणूकदारांची परिषद होती. तेथेही तेजस्वी अनुपस्थित राहिले. १५ डिसेंबर : तेजस्वी यादव एका आयटी कंपनीच्या छोट्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. १६ डिसेंबर : नितीशकुमार पाटणा येथील पीएमसीएचच्या नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. वास्तविक पाहता हा आरोग्य विभागाचा कार्यक्रम होता. हे खाते तेजस्वी यादव यांच्याकडे आहे; परंतु यावेळी तेजस्वी यादव आलेच नाहीत.१८ डिसेंबर : नितीशकुमार यांनी जनता दरबार घेतला. यात तीन खात्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जाणार होत्या. ही तिन्ही खाती तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. तरीही या कार्यक्रमाला उपस्थित न राहता ते दिल्लीला गेले.२१ डिसेंबर : पाटण्याच्या पशुवैद्यक महाविद्यालयातील कार्यक्रमापासूनही तेजस्वी यादव दूर राहिले. सध्या ते दिल्लीतच आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.