बंगळुरू : चंद्रयान-३ आणि आदित्य-एल१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. अंतराळवीरांना अवकाशात नेणाऱ्या गगनयान मोहिमेची अबॉर्ट चाचणी २६ ऑक्टोबरला केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत अंतराळवीरांना बाहेर काढणाऱ्या ‘क्रू एस्केप सिस्टिम’ त्यासाठी विकसित केल्याचे इस्रोने सांगितले. ही चाचणी यशस्वी ठरल्यास मानवाला अंतराळात नेण्याबाबत भारताचे पाऊल आणखी पुढे पडणार आहे.
काय आहे ‘क्रू एस्केप सिस्टिम’? -गगनयान मोहिमेमध्ये एका कॅप्सूलमध्ये बसून पृथ्वीभोवती सुमारे ४०० किमी अंतरावरून फेरी प्रदक्षिणा घालणार आहे.-यावेळी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ‘क्रू एस्केप सिस्टिम’ वापरली जाईल.
कशी होईल चाचणी? चाचणीसाठी इस्रोने लिक्विड रॉकेट तयार केले आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर १७ किमी उंचीवर अबॉर्ट सिस्टिम सुरू झाल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने त्यातील क्रू मॉडेल बंगालच्या उपसागरात उतरतील. नौसेनेकडून त्यांना बाहेर काढले जाईल.