मुंबई - सोशल मिडिया अॅप व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक शुक्रवारी रात्री जवळपसा 42 मिनिटे भारतासह संपूर्ण जगभरात डाउन झाले होते. यामुळे युझर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. रात्रीच्या साधारणपणे 11 वाजल्यापासून व्हॉट्सअॅप यूझर्सना मेसेज पाठविण्यास आणि रिसिव्ह करण्यास अडचणी जाणवल्या.
यासंदर्भात व्हाट्सअॅपनेही ट्विट केले आहे. यात त्यांनी युझर्सना उद्देशून म्हटले आहे, की "तुमच्या धैर्याबद्दल धन्यवाद, ती दीर्घ 45 मिनिटे होती, परंतु आम्ही पुन्हा आलो आहोत!
या काळात, युझर्सना व्हॉट्सअॅप, सिस्टिमला कनेक्ट करण्यातही अडचणी जाणवल्या. यानंतर युझर्सनी ट्विटरवर यासंदर्भात तक्रार करायलाही सुरुवात केली होती. एवढेच नाही, तर लोकांनी यासंदर्भात मिम्सदेखील तयार करून शेअर केले.
यावेळी अनेक इस्टाग्राम आणि फेसबुक यूझर्सनाही नव्या पोस्ट पाहण्यात अडचणी आल्या. तसेच ट्विटरवर व्हाट्सअॅप डाउन (WhatsApp Down) ट्रेंड करू लागले.