नवी दिल्ली : व्यक्तिगततेवर गदा आणणाऱ्या व्हॉट्सॲपच्या धोरणाचा बाऊ करत गेल्या महिन्यात अनेक वापरकर्त्यांनी टेलिग्राम, सिग्नल यांसारख्या मेसेजिंग ॲपचा अवलंब केला. व्हॉट्सॲपने ग्राहकांसाठी नव्या धोरणाचा स्वीकार करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, त्याआधीच अनेकांनी व्हॉट्सॲपला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा लावल्याने ही अंतिम मुदत मेपर्यंत वाढविण्यात आली. परंतु तरीही अनेकांनी व्हॉट्सॲपचा त्याग केला. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या महिन्यात टेलिग्राम ॲप डाउनलोड करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.६.३० काेटी जणांनी टेलिग्राम ॲप डाउनलोड केले एकट्या जानेवारी महिन्यात ४ पटींनी वाढ गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेतटेलिग्रामनंतर टिकटॉक या ॲपचा क्रमांक लागतोगेल्या महिन्यात जगभरात टेलिग्रामनंतर सर्वाधिक डाउनलोड झालेले ॲप म्हणजे टिकटॉक होयचीनमध्ये १७ टक्के लोकांनी तर अमेरिकेत १० टक्के लोकांनी टिकटॉक डाउनलोड केलेॲपल ॲप स्टोअर तसेच गुगल प्ले स्टोअर या दोन्हींच्या डाउनलोडच्या प्रमाणातही १ ते ३१ जानेवारी या कालावधीत वाढ झाली१.१५ काेटी भारतीयांनी गेल्या महिन्यात टेलिग्रामला आपलेसे केले६.०३काेटी इंडोनेशियन लोकांकडून टेलिग्राम डाउनलोड४०काेटी भारतीय वापरकर्ते व्हॉट्सॲपचे आहेतत्यामुळे भारतात व्हॉट्सॲपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सॲप पेक्षा भारी टेलिग्राम! ठरले सर्वाधिक डाउनलोड होणारे ॲप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 3:00 AM