मुंबई - सोशल मिडिया अॅप व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरण्यात युझर्सना अडचण जाणवत आहे. रात्रीच्या साधारणपणे 11 वाजल्यापासून अनेक व्हॉट्सअॅप यूझर्सनी त्यांना मेसेज पाठविण्यास आणि रिसिव्ह करण्यात अडच येत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतात तसेच जगाच्या इतरही काही भागांत व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउन झाले असून वापरण्यात अडचणी येत आहेत.
एवढेच नाही, तर या युझर्सना व्हॉट्सअॅप सिस्टिमला कनेक्ट करण्यातही अडचण येत आहे. यानंतर युझर्सनी ट्विटरवर यासंदर्भात तक्रार केली. यासंदर्भात लोक मिम्स तयार करून शेअर करत आहेत.
अनेक इस्टाग्राम यूझर्सनाही नव्या पोस्ट पाहण्यात अडचण येत आहे. तसेच ट्विटरवर व्हाट्सअॅप डाउन (WhatsApp Down) ट्रेंड करू लागले आहे.