शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

चिथावणीजनक मजकूरावर पायबंद; सरकारसमोर झुकत व्हॉटस्अ‍ॅपने केली तक्रार अधिकाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:49 AM

मेसेजिंग सेवादात्या व्हॉटस्अ‍ॅपने अखेर केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि केंद्र सरकारसमोर झुकत भारतासाठी तक्रार अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - मेसेजिंग सेवादात्या व्हॉटस्अ‍ॅपने अखेर केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि केंद्र सरकारसमोर झुकत भारतासाठी तक्रार अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.लोकांना चिथावणी किंवा द्वेष पसरविणारे संदेश तसेच खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्याची जबाबदारी या अधिकाºयावर असेल. खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज) प्रसारासाठी व्हॉटस्अ‍ॅपचा सर्वाधिक वापर होत असल्याकडे लक्ष वेधत केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉटस्अ‍ॅपवर दबाव वाढविला होता. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी या कंपनीने भारतात अधिकारी नियुक्त करावा, असा मुद्दा त्यांनी अलीकडेच व्हॉटस्अ‍ॅपचे सीईओ क्रिस डेनियल यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उपस्थित केला होता. अधिकाºयाच्या नियुक्तीत विलंब होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. डेनियल यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते.कोमल लाहिरी यांच्याकडे जबाबदारीगेल्या मार्चमध्ये फेसबुकमधून व्हॉटस्अ‍ॅपमध्ये दाखल झालेल्या कोमल लाहिरी या भारतात तक्रार अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, त्या ग्लोबल कस्टमर आॅपरेशन्स आणि लोकलायजेशन वरिष्ठ संचालक म्हणून काम पाहतील. फेसबुकमध्ये त्यांच्याकडे कम्युनिटी सपोर्ट सोशल नेटवर्किंगची जबाबदारी होती. फेसबुकच्या इन्स्टाग्राम कंपनीसाठीही त्या काम करीत होत्या. त्या सध्या कॅलिफोर्नियात व्हॉटस्अ‍ॅपचे मुख्यालय असलेल्या मेनलो पार्कमध्ये कार्यरत असून, लवकरच त्या भारतात तक्रार अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारतील.ई-मेलद्वारे करता येणार तक्रार...व्हॉटस्अ‍ॅप युझरला कोणत्याही प्रकारची तक्रार करायची झाल्यास कोमल लाहिरी यांना ई-मेल पाठवता येईल. युझर अकाऊंट आणि संबंधित सेवा-शर्तींबाबतही संपर्क करता येईल. व्हॉटस्अ‍ॅपने वारंवार विचारल्या जाणाºया प्रश्नांच्या (फ्रीक्वेन्ट आस्क क्वेश्चन) विभागात तक्रार अधिकाºयांच्या नियुक्तीबाबत माहिती जारी केली आहे.ट्रेसिंगच्या मुद्यावर ओढाताण सुरूच...कोणताही संदेश कुठून जारी झाला, याचा छडा त्याचवेळी लावणारी (रियल टाइम ट्रॅक) यंत्रणा लागू करण्याबाबत सरकारने केलेल्या मागणीची पूर्तता व्हॉटस्अ‍ॅपला करता आलेली नाही. ट्रेसिंगसंबंधी सध्याचे नियम आणि धोरणानुसार ही कंपनी त्याला मुभा देऊ शकत नाही. संदेशवहनासाठी ही कंपनी ज्या तंत्राचा वापर करते त्यानुसार रियल टाइम ट्रेसिंग शक्य नाही. केंद्र सरकारने दबाव आणल्यानंतर व्हॉटस्अ‍ॅपने त्यावर पर्याय शोधण्याचे आश्वासन दिले होते. वाढत्या फेकन्यूजला आळा घालण्यासाठी सरकारने काही मुद्दे सूचविले असून, त्यानुसार तक्रार अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपGovernmentसरकार