इम्फाळ : मणिपूरमध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाल्यानंतर आणलेली इंटरनेटबंदी अखेर १४४ दिवसांनंतर उठवण्यात आली असून, तेथील लोकांना सगळे व्हॉट्सअप मेसेजेस आता पाहायला मिळाले आहेत.
राज्य सरकारने इंटरनेट सुविधा ३ मेपासून बंद केली होती. शनिवारी ही बंदी उठवल्याची घोषणा मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, अफवा, फेक न्यूज व द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या प्रसाराने राज्यातील स्थिती आणखी बिघडू नये या उद्देशाने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मागील दोन महिन्यांमध्ये स्थिती सुधारली आहे.
१७५ बळी, १,१०० जखमीnहिंसाचारात १७५हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर ११०० हून अधिक नागरिक जखमी झाले. n५,१७२ ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. ३८६ धार्मिक स्थळांचे नुकसान करण्यात आले आहे.