शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

गुजरातमध्ये मोदी येत आहेत का विचारल्यावर कुत्र्याचा होकार, भाजपा नेत्याने ट्विट केला व्हिडीओ; युजर्स भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 5:09 PM

भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला असल्याने युजर्सच्या निशाण्यावर आले आहेत

नवी दिल्ली - भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला असल्याने युजर्सच्या निशाण्यावर आले आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडिया युजर्स त्यांच्यावर टीका करत आहेत. अमित मालवीय यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यामध्ये एका कुत्रा दिसत आहे. या कुत्र्याला एका महिलेने उचलून घेतलेलं आहे. ही महिला त्या कुत्र्याला प्रश्न विचारताना दिसत आहे.

व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, महिला आधी कुत्र्याला विचारते गुजरातमध्ये काँग्रेस येतय का ? यावर कुत्रा काहीच प्रतिक्रिया न देता शांत राहतो. नंतर महिला विचारते गुजरातमध्ये राहुल गांधी येतायत का ? या प्रश्नावरही कुत्रा काहीच प्रतिक्रिया देत नाही. यानंतर महिला विचारते गुजरातमध्ये मोदी येतायत का ? या प्रश्नावर कुत्रा दोन्ही पाय वर करुन प्रतिक्रिया देतो. 32 सेकंदाचा हा व्हिडीओ अमित मालवीय यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमुळे ते ट्रोल होत आहेत.

एक्झिट पोलचा कौल : दोन्ही राज्यांमध्ये कमळ; गुजरात भाजपाकडेच, हिमाचल काँग्रेसच्या हातातून जाणारगुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले असून, सर्व एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल आणि हिमाचल प्रदेशमध्येही हा पक्ष काँग्रेसकडून सत्ता हिरावून घेईल, असे एकमत झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सोमवार, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले, तर हिमाचल प्रदेशात एक महिन्यापूर्वी मतदान झाले होते. आजचे मतदान संपताच दोन्ही राज्यांमध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल आणि हिमाचल प्रदेशात सत्तांतर होऊन आणखी एक काँग्रेसशासित राज्य भाजपाच्या झोळीत जाईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता आहे.

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीत या दोघांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषत: सलग १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी ते पद सोडून पंतप्रधान म्हणून दिल्लीत गेल्यावर त्यांची या राज्यावरील पकड सैल झाली की अधिक बळकट झाली याचा कौल म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोदींनीही काहीही झाले तरी गुजरात हातचे जाऊ द्यायचे नाही या पक्क्या इराद्याने पंतप्रधानपदाच्या सर्व जबाबदा-या बाजूला ठेवून प्रचाराचे जातीने नेतृत्व केले. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळालेले राहुल गांधी यांनीही नव्या दमाने व कल्पकतेने प्रचाराची शिकस्त केली.

सरतेशेवटी दोन्ही बाजूंकडून प्रचाराची पातळी घसरली आणि गुजरातची निवडणूक ही मोदी व राहुल गांधी यांच्यातील व्यक्तिगत लढाई असे चित्र निर्माण झाले. ‘एक्झिट पोल’ हे ब्रह्मवाक्य नाही हे मान्य केले आणि याआधी अनेक एक्झिट पोलचे अंदाज काही वेळा सपशेल चुकलेही आहेत हे गृहीत धरले आणि यंदा आकडे कमी-जास्त झाले तरी त्यातून दिसणारा सत्तेचा अंतिम कौल चुकेल, असे त्यामुळेच वाटत नाही.

एक्झिट पोलनुसार भाजपा गुजरातेत विजयी झाल्यास, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून चौखूर सुटलेल्या भाजपाच्या वारूची दौड अद्यापही सुरूच आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नशिबी आणखी एक पराभव आला आहे, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटर