नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शह सोमवारी लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी केलेल्या टीकेवर बोलताना म्हणाले, की मी कधीच कुणावरही रागावत नाही, पण जेव्हा काश्मीरचा प्रश्न येतो, तेव्हा राग येतो.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 'मॉडेल प्रिझन मॅन्युअल' -‘फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक, 2022’ चर्चेसाठी तसेच मंजुरीसाठी सभागृहात ठेवताना शाह म्हणाले, सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक ‘मॉडेल प्रिझन मॅन्युअल’ तयार करत आहे. जे राज्यांना पाठवण्यात येणार आहे.
‘नाही बघणार, कारण तुम्ही सरकारमध्ये नाही' -यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय म्हणाले, आपण अशा कोणत्याही मॅन्युअलचा मसुदा पाहिला नाही. यावर शाह म्हणाले, "नाही बघणार, कारण तुम्ही सरकारमध्ये नाही." आता सरकार बनवत आहे. तुम्ही सरकारमध्ये असतात तर नक्कीच बघितले असते. तुम्हाला अधिक खात्री देण्यासाठी मी हे सांगत आहे.
यावर तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय म्हणाले, 'जेव्हा आपण दादा (सौगता रॉय) यांच्याशी बोलता तेव्हा रागावत बोलता. यावर शाह हसले आणि म्हणाले, 'नाही, नाही... मी कधीच कोणाला रागवत नाही. माझा आवाज थोडा मोठा आहे. हा माझा 'मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट' आहे.
काश्मीरवर प्रश्न येतो, तेव्हा...शाह म्हणाले, ‘ना मी कधी कुणावर रागावतो, ना मला कधी राग येतो. काश्मीरचा प्रश्न येतो तेव्हा राग येतो. बाकी नाही येत.’ यावर सत्ताधारी आणि विरोधक मस्तपैकी हसताना दिसले.