नवी दिल्ली : वनप्लस स्मार्टफोनच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने कंपनीने नवीन परवडणाऱ्या किंमतीतील रेंज लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार OnePlus Nord स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. याची किंमत 25000 पेक्षा कमी ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन इंडियाच्या टीझर पेजवर हा फोन कधी लाँच होईल याची माहिती चुकून दिली गेली होती. ती डिलीट करण्यात आली आहे.
टीझर पेजवर OnePlus Nord च्या AR लॉन्च इव्हेंटची माहिती देण्यात आली. मात्र याचवेळी चुकून लाँचिंगची तारीखही टाकण्यात आली होती. या फोटोमध्ये AR लॉन्च इन्व्हाईटही टाकण्यात आले होते. तसेच या फोटोवर क्लिक केल्यावर ओपन होणाऱ्या पेजवर एक लिंकही देण्यात आली होती. सध्या ती लिंक लाईव्ह नाहीय. सर्वात आधी टेक रडारने याची माहिती दिली.
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर असणार आहे. हा फोन भारत आणि युरोपमध्ये लाँच केला जाणार आहे. या लीकनुसार हा फोन भारतात येत्या 21 जुलैला लाँच केला जाणार आहे. वनप्लसने अमेरिकेतही धुमाकूळ घातला आहे. मात्र, हा फोन अमेरिकेत लाँच केला जाणार नाही. भविष्यात मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या मालकाचे ट्विटकार्ल पे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये 2014 मध्ये केलेले कंपनीचे एक जुने ट्विट एम्बेड आहे. हे ट्विट तेव्हाचे आहे जेव्हा कंपनीने पहिला वनप्लस One लाँच केला होता. या ट्विटमध्ये फोनचे नाव तर नाही घेतले गेलेय परंतू नव्या फोनची किंमत पहिल्या वनप्लसएवढी असण्याची शक्यता आहे. कंपनीने 299 डॉलरला हा स्मार्टफोन लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 16 जीबी मॉडेलची होती. या ट्विटनंतर उडालेल्या अफवांनुसार अॅपलचा आयफोन SE आणि गुगलच्या Pixel 4a ला टक्कर देण्यासाठी हा स्वस्त अँड्रॉईड फोन आणला जाणार आहे. जर या फोनची किंमत 299 डॉलर असेल तर तो आयफोन एसईपेक्षा 100 डॉलर आणि पिक्सल 4ए पेक्षा 50 डॉलरने स्वस्त असणार आहे. सध्या वनप्लसचा कोणताही फोन iPhone SE ला टक्कर देत नाही. वनप्लसने नुकतेच वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो फोन लाँच केले आहेत. ते iPhone 11 आणि गॅलेक्सी S20 चे प्रतिस्पर्धी आहेत.
स्वस्तातील टीव्ही लाँचवनप्लसने गेल्या आठवड्यात तीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. OnePlus TV U1 55, OnePlus TV 4-Series 43 आणि OnePlus TV Y-Series 32 इंचाचे हे टीव्ही आहेत. प्रत्येक टीव्हीची सिरिज वेगळी असली तरीही 32 इंचाच्या टीव्हीची किंमत आश्चर्यचकित करणारी आहे. OnePlus TV Y-Series 32 याची किंमत 12,999 रुपये आहे. तर 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 22,999 रुपये आहे. 55 इंचाच्या टीव्हीची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती
लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज
गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार
FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच
विद्यापीठांच्या परिक्षांची घोषणा झाली, या महिन्यात होणार; यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले