शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

भारतीय चलनी नोटांवर कधी आला महात्मा गांधींचा फोटो? जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 3:22 PM

भारतीय रुपये पर महात्मा गांधी की जो तस्वीर दिखती है, वो साल 1946 में कलकत्ता में खींची गई थी.

Mahatma Gandhi Jayanti:महात्मा गांधींचा(Mahatma Gandhi) हसतमुख चेहरा भारतीय रुपयाची ओळख आहे. पण भारतीय चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो कधी आणि कसा आला? हा फोटो कुठला आहे आणि तो कोणी काढला? असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील. आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर 49 वर्षांपर्यंत महात्मा गांधींचा फोटो भारतीय चलनावर कायमस्वरुपी छापला जात नव्हता. पूर्वी नोटांवर अशोक स्तंभ असायचा.

1949 पर्यंत नोटांवर किंग जॉर्जचा फोटो15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला, परंतु दोन वर्षांनंतरही स्वतंत्र भारताच्या चलनात कोणताही बदल झालेला नव्हता. 1949 पर्यंत नोटांवर ब्रिटनचा राजा जॉर्ज (6वा) याचे चित्र छापले जात होते. 1949 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा 1 रुपयाची नवीन नोट आणली आणि त्यावर किंग जॉर्जऐवजी अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला.

1950 मध्ये सरकारने 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटांवरही अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला होता. पुढील काही वर्षे अशोक स्तंभासह भारतीय रुपयावर वेगवेगळी चित्रे छापली जात होती. उदाहरणार्थ - आर्यभट्ट उपग्रह, कोणार्क सूर्य मंदिर आणि शेतकरी.

गांधीजींचा फोटो कधी छापण्यात आला?1969 साली पहिल्यांदाच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आला. त्यावर्षी महात्मा गांधींची 100 वी जयंती होती आणि त्यानिमित्ताने नोटांची एक विशेष मालिका बाजारात आणली होती. या सीरिजमधील नोटांवर महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचा फोटो छापण्यात आला होता. 1987 मध्ये दुसऱ्यांदा 500 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.

1996 मध्ये RBI ने फोटोला कायमस्वरूपी स्थान दिले1995 मध्ये रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कायमस्वरुपी छापण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. सरकारच्या मान्यतेनंतर 1996 मध्ये अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा छापल्या जाऊ लागल्या. त्यानंतरही नोटांवरुन अशोकस्तंभ पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला नाही. डाव्या बाजूला लहान आकारात छापला जातो. 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या फोटोसह नोटांची नवीन मालिका सुरू केली. नोटेवर महात्मा गांधींच्या चित्रासोबत ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगोही छापण्यात आला.

नोटांवरील गांधीजींचा फोटो खराभारतीय नोटांवर दिसणारा महात्मा गांधींचा फोटो व्यंगचित्र किंवा चित्रण नसून मूळ फोटोचा कट आहे. हा फोटो 1946 मध्ये कलकत्ता (आता कोलकाता) येथील व्हाइसरॉयच्या घरात काढण्यात आला होता. तेव्हा महात्मा गांधी ब्रिटिश नेते लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स यांना भेटायला गेले होते. त्यांचा हा फोटो त्यावेळी काढण्यात आला होता.

टॅग्स :Indian Currencyभारतीय चलनMahatma Gandhiमहात्मा गांधीJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स