शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 9:27 AM

समाजमाध्यमांच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे.

ठळक मुद्देझुकेरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींसाठी आपला प्रोफाईल फोटो बदलला होता.मोदी सरकारच्या फ्लॅगशिप प्रोग्राम डिजिटल इंडियाच्या समर्थनार्थ फोटो बदलला होता. बदललेल्या प्रोफाईल फोटोवर तिरंगा होता.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या व जगभरात कोट्यवधी ‘फॉलोअर्स’ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजमाध्यमांना सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी (3 मार्च) अचानक जाहीर केला. समाजमाध्यमांच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेले नाही. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींसाठी आपला प्रोफाईल फोटो बदलला होता. 

झुकेरबर्ग यांनी मोदी सरकारच्या फ्लॅगशिप प्रोग्राम डिजिटल इंडियाच्या समर्थनार्थ आपला प्रोफाईल फोटो बदलला होता. सप्टेंबर 2015 मध्ये झुकेरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींना फेसबुकच्या हेडक्वार्टर्समध्ये आमंत्रित केले होते. मोदींची भेट घेण्याआधी त्यांनी फेसबुकवर आपला प्रोफाईल फोटो बदलला होता. तसेच 'मी डिजिटल इंडियाच्या समर्थनासाठी आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे. ग्रामीण भाग हा इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत अधिक सेवा ऑनलाईन पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे' असं त्यांनी फेसबुकवर म्हटलं होतं. 

बदललेल्या प्रोफाईल फोटोवर तिरंगा होता. तसेच नरेंद्र मोदींनीही त्यावेळी सोशल मीडियावर असलेलं प्रेम जाहीर केलं होतं. पंतप्रधान मोदींनी रात्री 8.52 वाजता एक ट्विट केलं. मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन.  अनेक मोदी चाहत्यांनी त्यांना हा निर्णय बदलवावा अशी मागणी करत आहेत. पण नेमकं नरेंद्र मोदीसोशल मीडियावरील अकाऊंट का बंद करतायेत? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फॅन फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे. कोट्यवधी युजर्स नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेशी संवादही साधतात, मग त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला हे अद्याप समजू शकले नाही. पण नरेंद्र मोदींनी याप्रकारचं ट्विट केल्यानंतर अनेक शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ट्रेंड पण सुरू करण्यात आला आहे. जवळपास 50 हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय का घेतला. पण या उत्तरासाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण स्वत: नरेंद्र मोदीच याचं उत्तर देतील. मात्र काही शक्यता सोशल मीडियावर वर्तवली जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार

भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण

द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी

‘निर्भया’च्या चारही खुन्यांची आजची फाशीही टळली

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया