उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एका महिलेचा सांगाडा सापडल्याची घटना समोर आली आहे. हा सांगाडा एका 65 वर्षीय महिलेचा असल्याचं सांगितलं जातं. सुमारे 15 वर्षे ही महिला एकटीच राहत होती. सुमारे पाच महिन्यांपासून ती कोणालाच दिसली नव्हती. पोलिसांनी घरातून सांगाडा जप्त केला आहे. वास्तविक, वडिलांच्या मृत्यूनंतर ही महिला तिच्या आईसोबत राहू लागली. 15 वर्षांपूर्वी आईचेही निधन झाले. यानंतर ती मोठ्या घरात एकटीच राहत होती. अधूनमधून ती किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जात असे.
ऑगस्ट 2022 पासून, कोणीही तिला बाहेर पडताना पाहिले नाही. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. 16 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तिच्या घराचे कुलूप तोडले असता महिलेचा सांगाडा सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय निर्मल देवी आग्रा येथील उत्तर विजय नगर कॉलनीतील 67 क्रमांकाच्या मोठ्या घरामध्ये राहत होत्या. त्या अविवाहित होत्या. वडील गोपाल सिंग यांचा फाउंड्री नगरमध्ये खताचा कारखाना होता.
निर्मल देवी ज्या घरमध्ये राहायच्या त्या घराची किंमत करोडोंची आहे. पोलिसांनी निर्मल यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी निर्मलचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, सहा महिन्यांपासून तिला बाहेर पडताना पाहिले नसल्याचा दावा शेजाऱ्यांनी केला आहे. उत्तर विजय नगर येथील रहिवासी शशी देवी सांगतात की, निर्मल देवी यांचे कुटुंब या वसाहतीत 50 वर्षांपासून राहत होते.
निर्मलचे आई-वडील संध्याकाळी कॉलनीत फिरायला जायचे. त्यावेळी निर्मल शिकत होती. दयालबाग विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. यानंतर ती कोणत्या ना कोणत्या शाळेत शिकवायला जायची. मात्र, तिने लग्न केले नाही. वडील गोपाल यांचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांची आई होशियारी देवी यांचेही 14-15 वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ती एकटीच राहत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"