नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाची माहिती दिली. पूर्व लडाखमधील तणाव, चीनकडून सुरू असलेले घुसखोरीचे प्रयत्न याची माहिती सिंह यांनी लोकसभेच्या माध्यमातून देशाला दिली. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. 'चीनकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे,' अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर थेट निशाणा साधला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी चीनला फटकारलं; लडाख सीमेवरील संपूर्ण स्थिती लोकसभेत मांडली'मोदींनी चीनच्या अतिक्रमणावरून देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. आपला देश कायम सैन्यासोबत उभा होता, आहे आणि राहील,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार आणि चीनकडून आपली जमीन कधी परत घेणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असं राजनाथ सिंह म्हणाले.चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्रपारंपारिक सीमेबद्दल दोन्ही देशांचे वेगवेगळे अर्थ आहेत असा चीनचा दावा आहे. १९५०-६० च्या दशकात हे दोन्ही देश याबद्दल बोलत होते पण कोणताही तोडगा निघाला नाही. चीनने लडाखमधील काही जमीन फार पूर्वी ताब्यात घेतली होती, त्याव्यतिरिक्त पाकिस्तानने पीओकेमधील काही जमीनही चीनच्या ताब्यात दिली. ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचे निराकरण शांततेने व वाटाघाटीने करायला हवे. सीमेवर शांतता राखणे महत्वाचे आहे. सध्या एलएसीसंदर्भात दोन्ही देशांचे वेगळे मत आहे. शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. १९८८ पासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधात विकास झाला. द्विपक्षीय संबंधही विकसित होऊ शकतात आणि सीमादेखील तोडगा निघू शकतो, असा विश्वास भारताला आहे. तथापि, त्याचा द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो असं ते म्हणाले.